पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शास्त्रीय संगीताचे गाढे व्यासंगी
प्रो. ग. ह.रानडे



 ही कथा आहे संगीताच्या एका निःसीम उपासकाची. संगीतकलेचा आविष्कार करुन दाखवण्याची किमया, आवाजाची अनुकूलता नसल्याने नव्हती पण त्याची कसर या साधकाने आयुष्यभर त्या महान कलेची शास्त्रीय अपपत्ती समजून घेण्यात व समजावून देण्यात भरुन काढली.
 हा संगीततज्ञ म्हणजे प्रो. ग.ह रानडे.
 १ ऑक्टोबर १९९७ रोजी त्यांची जन्मशताब्दी झाली म्हणून त्यांचे थोडे तरी स्मरण केले गेले, अन्यथा विस्मृतीच्या गर्तेत गेलेल्या या गुणीजनाचे सर्वसामान्य रसिकालाहि नाव माहीत असणे तसे कठीणच !
 आजचे एक आघाडीचे संगीत समीक्षक, संगीतशास्त्राविषयी अत्तम बोलतात, गाण्याच्या शास्त्रीय अंगाविषयी भरभरुन बोलतात, त्यात त्यांचा पराकोटीचा अभ्यास दिसून येतो; मात्र तोच माणूस तंबोरा घेऊन मैफलीत गायला बसतो तेंव्हा कुठे गेली याची प्रतिभा असा सामान्य श्रोत्याला प्रश्न पडतो.
 असंच काहीसं प्रो. गणपतरावजी रानडे यांचे बाबतीत झालं. आवाजाची अनुकूलता नसल्यामुळे असेल, किंवा वयाच्या सत्ताविसाव्या वर्षानंतर गायनास सुरुवात केल्यामुळे असेल. मात्र गायक म्हणून जरी त्यांची छाप पडली नसली तरी संगीतातील शास्त्रीय अंगाचा गाढा व्यासंगी म्हणून कै. भातखंडेबुवांच्या बरोबरीने त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतले जातं.
 प्रो. ग.ह. रानडे हे व्यवसायाने प्राध्यापक, फिजिक्सचे प्राध्यापक. त्यामुळे त्यानी संगीताचा, शास्त्रीय दृष्टीकोनातून, विचार केला आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे ‘फिजिक्स' च त्यानी पुस्तकाद्वारे, संगीताच्या अभ्यासकांसमोर मांडून, त्यांच्यावर मोठे अपकारच केले आहेत.
 अशा या गणपतराव रानडे यांचा जन्म सांगलीत १ ऑक्टोबर १८९७ रोजी झाला. रानडे यांचे पूर्वज मूळ कोकणातले, मौजे जामसांडे, तालुका देवगड
सांगली आणि सांगलीकर................................................................ ९९