पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पौराहित्याखाली अनेक विद्वान ब्राम्हणांनी सर्व धार्मिक कृत्ये पार पाडली. असा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी, त्याकाळात दहाबारा हजार लोकांचा जनसमुदाय अपस्थित होता. महाराष्ट्रातील संस्थानिक, कारखानदार, अद्योगपती, म.म.दत्तो वामन पोतदार, काणे, पंडित सातवळेकर यांजसारखे अनेक विद्वज्जन आवर्जून आले होते. दादासाहेबांचे वजन १२९ पौंड भरले. दुसऱ्या पारड्यात घातलेल्या सोन्यांच्या विटांची किंमत रु. ५,३७,६००/- एवढी भरली. या रकमेतून वेगवेगळे ट्रस्ट निर्माण करुन शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय कार्यासाठी त्यांचा विनियोग करण्यात येतो. आजवर या ट्रस्ट माध्यमातून सुमारे वीस लाखाहून अधिक रक्कम देणगी स्वरूपात वाटली गेली आहे.
 रोजी ४ आणे मजुरीवर काम करणारा एक सामान्य माणूस, आपल्या अंगमेहेनतीने आणि बुद्धिवैभवाने, एवढी संपत्ती समाजासाठी आपल्या प्रयत्नातून भी करतो हे केवढे बोलके अदाहरण समाजापुढे आहे! दुर्दैवाची बाब अशी की यापासून बोध घेणे दूरच, पण या ट्रस्टस्मधून मिळालेल्या देणगीचा आपल्या अत्कर्षासाठी पुरेपूर अपयोग करुन, त्या देणगीकर्त्यांच्या अद्देशाला पुरेपूर न्याय दिला अशी अदाहरणे दादासाहेबाना दुर्दैवाने कमीच आढळली. श्रम करुन धन जोडणारे आणि अनायासे मिळालेले दानरूपी धन अधळणारे यातील तफावत किती कमालीची असावी? पैसे मागताना जी वचने दिली जातात त्याच्या दशांशानेही पाळली जात नाहीत ही दादासाहेबांची व्यथा होती.
 याठिकाणी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी आहे. दादासाहेबानी शालेय शिक्षण अर्धवट सोडले. बडोद्याच्या कलाभुवनमध्ये धंदेशिक्षणासाठी जाण्याचे ठरविले, तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. ब्राह्मणाच्या मुलाने लौकिक शिक्षण घ्यावे. नंतर कोणी मामलेदार, वकील व्हावे. समाजात रावबहाद्दूर रावसाहेब म्हणून मिरवावे अशीच सर्वसाधारण अपेक्षा असे. दादासाहेबानी शिक्षण अर्धवट सोडले तेव्हा हा बिचारा आता घिसाडी, सुतार किंवा एखादा कोष्टी होणार म्हणून सर्वानी नाके मुरडली. पण गंमत बघा. याच माणसाने स्वप्रयत्नांवर ३मागांपासून तो ३०० माग आणि ८००० चात्यांनी सुसज्ज असा कारखाना नावारुपास आणला. ३००- ४०० कामगारांना रोजची रोजी-रोटी मिळवून दिली. अनेक सुशिक्षित, पदवीधर मंडळी त्यांच्या हाताखाली कामाला राहिली. त्यांच्या सुवर्णतुलेच्या प्रसंगी अनेक वकील, मामलेदार, डॉक्टर्स अपस्थित तर होतेच पण विद्वान पंडित, अच्च अधिकारी आणि राजे-महाराजे अशा प्रतिष्ठितांची लक्षणीय अपस्थिती होती.
 म्हणजे वेलणकर ‘घिसाडी' होणार म्हणून टिंगलटवाळी करणाऱ्यांच्या कुत्सित
सांगली आणि सांगलीकर................................................................... .९५