पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माग जपानी 'वल्कली' कापडासाठी अशी विभागणी झाली.
 लो. टिळक १९२० साली ज्योतिषसंमेलनाच्या निमित्ताने सांगलीत आले तेव्हा त्यानी आपल्या स्वदेशीच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या दादासाहेब वेलणकरांच्या श्रीगजानन मिलला आवर्जून भेट दिली. दीड तास सर्वत्र हिंडून कारखाना बघितला. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, “आता मला यापुढे एखाद्या तरुणाने मी काय करु असे विचारले तर मी वेलणकर यांजकडे बोट दाखवेन. बोट दाखवायला अशी जागा केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. "
 केवढे गौरवास्पद प्रशस्तिपत्र !
 १९३९ च्या सुमारास स्पिनिंगची इमारत बांधून झाली. स्पिनिंगची यंत्रे इंग्लंडहून आली होती. विणकामखात्याची इमारत १९२५ सालीच बांधून झाली होती. १९४० साली या इमारतीत सूतकताईचे काम सुरु झाले. त्यामुळे सर्व विणकामखात्यास सुताचा पुरवठा होऊ लागला. सुतापासून तो तहत पातळ निर्माण होण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करणारी श्रीगजाननमिल्स ही एक स्वयंसिद्ध व स्वयंपूर्ण मिल झाली. ज्यादिवशी गिरणीतील सुतापासून थेट पातळाची निर्मिती कारखान्यात झाली त्यादिवशी त्या पातळाची घडी घालताना दादासाहेबांना एव्हरेस्ट जिंकल्याचा आनंद मिळाला! त्या अनुपमेय आनंदाची कल्पना अविरत कष्ट करणाऱ्या महाभागासच येऊ शकेल.
 असे होता होता वयाची साठी केव्हा जवळ येऊन ठेपली ते दादासाहेबांना अमगलेच नाही. आप्तेष्ट, स्नेहीमंडळी जेव्हा एकसष्ठी करायची, थाटात करायची अशा गोष्टी बोलू लागले, तेव्हा दादासाहेबाना काहीतरी खटकले. वाढदिवसाच्या दिवशी अितरांकडून काही घ्यायचे त्यांना पटेना; अलट ज्या समाजात आपण वावरतो, त्यांच्यासाठी आपल्याला काही करता आले तर? धंदा सुरु करुन स्वत:च्या पायावर अभे राहायचे तर धंदेशिक्षण, भांडवल अशा अनेक गोष्टी द्रव्याअभावी अडतात. मग त्यासाठी एखादा निधी अभा करुन आपणच गरजूना मदत केली तर? या विचारमंथनातून सुवर्णतुलेची कल्पना पुढे आली. आपल्या वजनाइतके सुवर्ण समाजाला दान करायचे! म्हणजे तेवढ्या किंमतीचा एक विश्वस्त निधी निर्माण करायचा आणि त्यातून गरजू लोकाना मदतीचा हात द्यायचा. एकसष्टाव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर, १९ जानेवारी १९४७ या दिवशी सुवर्ण-तुलेचा समारंभ थाटामाटात पार पडला. ज्या सांगलीच्या राजेसाहेबांनी, दादासाहेबाना गरजेच्या वेळी मदतीचा भक्कम हात पुढे केला, त्यांच्या व औंधच्या प्रगतिशील संस्थानचे संस्थानिक श्री पंतप्रतिनिधी यांचे हस्ते हा सुवर्णतुलेचा विधी संपन्न झाला. श्री. छत्रे गुरुजींच्या
सांगली आणि सांगलीकर....................................................................... .९४