पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
.............................

मनामनाचा मेळ जाहला नभाहुनी थोर ।
निरोप घेऊनि आता मित्रा कोठे जाणार?"

 त्यांच्या एका सत्कार समारंभात, त्यांच्या विद्यार्थ्यांनी आग्रह केला म्हणून त्यानी निरनिराळ्या वृत्तांमध्ये आभार मानले.
 एकदा तर त्यांच्या शीघ्रकवित्वाची कसोटीच लागली; आणि ती सुद्धा एका मातब्बर अशा कवीपुढे! त्याचं असं झालं :
 एकदा सुप्रसिद्ध कवि रेंदाळकर सांगलीला आले होते. त्याना साधुदासांचे शीघ्रकवित्व हे काहीतरी गौडबंगाल असावे असे वाटे. पहाटे अठल्यावर त्यानी पेन आणि कागद साधुदासांसमोर धरले; आणि आत्ताच्या आत्ता कविता लिहा म्हणून, सांगितले. अशी परीक्षा होईल याची साधुदासाना तिळमात्र कल्पना नव्हती. तरीपण न गडबडता, त्यानी कोणत्या विषयावर कविता लिहू असे विचारले, तेव्हा रेंदाळकर म्हणाले, “वाटेल त्या विषयावर लिहा.” साधुदास म्हणाले, "आता ते चालणार नाही, विषय तुम्हीच द्या. नाहीतर म्हणाल की कविता पूर्वीच करुन ठेवली होती" रेंदाळकर म्हणाले, “मग मी कविता मागत आहे याच विषयावर लिहा. "
 लागलीच चोवीस ओळींची कविता सरसर लिहून साधुदासानी रेंदाळकरांच्या पुढ्यात ठेवली. तेव्हा ते चाट पडले. पुढे ही हकीकत त्यानी सुप्रसिद्ध कादंबरीकार, हरीभाऊ आपटे, याना सांगितल्यावर त्याना पण आश्चर्य वाटले. ताबडतोब त्यानी ती कविता आपल्या 'करमणूक' मध्ये प्रसिध्द केली.
 त्या गाजलेल्या कवितेचे काही चरण असे होते.

"कविने कविता मज मागितली, करण्या बसल्या समयी कथिली ।
कविता मज पाहुनिया रुसली, तरि आज करु कविता कसली ॥
कविता स्वर का विण्यामधले, म्हणूनी तुज छेडुनि दावू भले ।
कविता गुज बोल मनापुरता, प्रिय तू बन, मी करितो कविता ॥"

 इतके शीघ्रकवित्व अंगी असूनहि, खुद्द साधुदासाना त्याचे काही विशेष वाटत नसे. ते म्हणत की हे सारे सरावाचे काम आहे. काव्याचा मुख्य गाभा म्हणजे रसपरिपोष वृत्ताच्या साच्यात घालण्याचे काम फारसे महत्त्वाचे नाही.

 साधुदासानी सहज म्हणून अनेक काव्ये रचली. एखादा विशेष समारंभ, दरबारातील प्रसंग, दसऱ्याचे सोने, तिळगूळ समारंभापासून अगदी नामकरण समारंभापर्यंत, अनेक निमित्ताने त्यानी कविता लिहिल्या. श्वास घ्यावा अितक्या सहजतेने ते कविता


सांगली आणि सांगलीकर................................ .८२