पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विनंती केली होती की कमीतकमी तीन महिने, त्यानी आबासाहेबांच्या नजरेसमोर, सांगलीत रहावे. लोकमान्यांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून, असे निवांत तीन महिने देणे शक्यच नव्हते. पण तसे ते राहते तर कदाचित् खाँसाहेबांसारखा एखादा चमत्कार घडलाही असता! आबासाहेबांजवळ राहून अपचार करून घेण्यासाठी, नाथमाधवांसारखे सुप्रसिद्ध लेखक त्यांच्या पायाच्या व्याधीसाठी येऊन राहिले होते. सुप्रसिद्ध गायिका मोगुबाई कुर्डीकर, त्यांचा घसा खराब झाला, तेव्हा आबासाहेबांचे औषधोपचार लाभावेत म्हणून त्या सांगलीत येऊन राहिल्या होत्या.
 पण दैवदुर्विलास असा की, हा लोकविलक्षण धन्वंतरी, स्वतः मात्र १९३३ च्या प्लेगच्या साथीचा बळी ठरला.
 त्यानी लोकमान्यांचा संदेश सामान्य जनांमध्ये पोचवणारा दिमाखदार गणपती- अत्सव १८९९ मध्ये सुरू केला त्या गोष्टीला १९९९ साली १०० वर्षे पूर्ण झाली आहेत.
 त्या शताब्दीवर्षाच्या निमित्ताने, त्यांचे पुनर्म्मरण होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

●●●

सांगली आणि सांगलीकर............................................................७६