पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परवानगी घिऊन या जावा.'
 'दादा, विखेपाटलांचा कारखाना एकडाव आमाला दावून आणा.'
  "यंदाला साकार लई बारीक पडतीया गा दादा! तर काय करावं म्हंताया?'
 ‘आमच्या गावात लई पाय पडायला लागल्यात तवा कसं वागावं "म्हंतासा?'
  'दादा, आज जेवाय काय दिकुन न्हाई घरात! कारबाऱ्यांनी दारूच्या पायात लई मारलं बगा. पाक यिकून आल्याती घरातलं! चार कच्चीबच्ची पदरात तर आमी काय तोड काडावी जी?'
 " न्हवं, ऐका मी काय म्हंतूया ते. तुमी सांगशीला दादा, तर घीन नाव मागं निवडणुकीतनं! बाकी कुनी बोलूनी आमाला! मी म्हटलूया सर्व्यांला की, दादा सांगत्याल तरच माघारी घीन. कशी गत करता ? '
 डॉ. सरोजिनी बाबर यांची दाखवलेली ही एक झलक. वसंतदादा स्वतः सगळ्यांचं ऐकत प्रत्यक्ष निराकरण करत. कधी संबंधितांना फोन Sujits लावत तर कधी योग्य त्या माणसाकडे चिठ्ठी देऊन पाठवत.

 असा हा ग्रामीण जनतेचा 'राजा', मुंबईच्या मोठमोठ्या उद्योगपतींबरोबर सहजतेने संवाद साधत असे. साखर कारखाना पहायला आलेल्या जपानी शिष्टमंडळांबरोबर तांत्रिक विषयांवर चर्चा करी तर कधी कृषितज्ज्ञांबरोबर आठमाही पाणी की बारमाही पाणी, ऊस लागवड, जिरायती जमिनी, बागायती कशा बनवायच्या, असल्या विषयांचा काथ्याकूट करी. हे सगळं विलक्षण होतं. त्यांच्या कमी शिक्षणाची थोडी टवाळी करण्याच्या दृष्टीने एका मराठी भाषिक निष्णात वकिलाने कोर्टाला

५४ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील