पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असते. पण लोकांनी त्यांना स्वस्थ थोडंच बसू दिले असते ? सांगलीत दादा असले की त्यांच्या निवासस्थानी भरणारी लोकांची गर्दी ज्यांनी बघितली आहे त्यांनाच ही गोष्ट समजू शकेल. या सगळ्या गोष्टींपासून दूर असावे या विचारानेच त्यांनी राजस्थानचे राज्यपालपद स्वीकारून निवांतपणे राहायचे ठरवले असावे. कदाचित अनिच्छेने पण अपरिहार्य म्हणूनही असेल.
 मुख्यमंत्रीपद म्हणजे काटेरी मुकुट तर राज्यपाल पद म्हणजे सोन्याचा पिंजरा. दोन्ही सन्मान वसंतदादांनी 'सुखदुःखं समेकृत्वा' अशा भावनेनेच स्वीकारले. राजस्थानमधील त्यांचे दिवस तसे सुखात चालले होते पण त्यांच्यासारख्या सतत कामात असणाऱ्या आणि कामातच रमणाऱ्या माणसाला त्यात सुख वाटले असेल?
 २६ फेब्रुवारी १९८९ ला सोलापुरात भरलेल्या महाराष्ट्र राज्य व्यापारी परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी आले असताना स्टेजवरच त्यांची प्रकृती बिघडली. अस्वस्थ वाटूलागले. ताबडतोब त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पण प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना तातडीने मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दिमतीला होते. पण वसंतदादांचे थकलेले मधुमेहाने पोखरलेले शरीर उपचाराना काही साथ देईना आणि अखेर १ मार्च १९८९ ला बॉम्बे हॉस्पिटलमध्येच त्यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मात्र सांगलीतच कृष्णातीरी झाले.

 २४ जुलै १९४३ ला सांगलीचा तुरुंग फोडून पलायन करणाऱ्या वसंतदादांवर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव झाला. त्यावेळी त्यांना

५० / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील