पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यशवंतरावांना अभिमान होता. ते सांगलीतील जाहीर सभेमधून नेहमी सांगत, ‘वसंतदादा ही एक विधायक कामाची शक्ती आहे. या शक्तीचे दर्शन घडले की माझा उत्साह द्विगुणीत होतो. तो बरोबर घेऊनच मी इथून जात असतो.' यशवंतरावांनी कोणतीही कल्पना मांडावी आणि वसंतदादांनी ती सांगलीत यशस्वी करून दाखवावी अशी एक परंपराच निर्माण झाली होती. राम-लक्ष्मणांसारख्या असलेल्या या 'यशवंत- वसंत' जोडीचे साऱ्या महाराष्ट्राला कौतुक होते. त्यामुळेच ही जोडी तुटल्याचे दुःख सर्वांनाच झाले. खुद्द वसंतदादांनी याबाबतीत एके ठिकाणी म्हटलंय, 'आजवर मी यशवंतरावांना मान देत आलो होतो. त्यांचा प्रत्येक शब्द पाळला होता. त्यांनीही मला विश्वास दिला होता. त्यांनी एकाएकी माझा विश्वासघात केला. त्यांनी मला सांगितले असते तर मी स्वतःहून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असता.'
 वसंतदादा ६ मार्च १९४८ ला मुख्यमंत्री बनले आणि १७ जुलैला त्यांना राजीनामा द्यावा लागला.

 पण राजकारण मोठे विचित्र असते. क्रिकेटच्या खेळासारखीच अनिश्चितता त्यामध्ये असते. राजकारणातून पूर्णपणे बाहेर फेकल्या गेलेल्या आणि जवळपास अज्ञातवासात गेलेल्या इंदिरा गांधी, चिकमंगळूरची त्या काळात गाजलेली निवडणूक जिंकून पुन्हा यशस्वीपणे राजकारणात आल्या आणि सगळे पारडे फिरले! जनता दलाचे केंद्रातील चरणसिंगांचे मंत्रिमंडळ कोसळले. पुन्हा लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका जाहीर झाल्या. इंदिराजींनी यशस्वी पुनरागमन केले. पुन्हा त्या देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ झाल्या. त्यांच्या आदेशानुसार वसंतदादांनी सांगली

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ४३