पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुरक्षा धोक्यात आली होती. तेव्हा अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलास पूरक मदत म्हणून गृहरक्षक दलाची योजना अंमलात आली. तत्कालिन सातारा जिल्ह्याचे होमगार्ड कमांडंट म्हणून वसंतदादांची निवड करण्यात आली. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण वसंतदादांनी घेतले. १९४८ ते १९५० या काळात उत्तम काम करून त्यांनी सर्वांची वाहवा मिळवली.
 त्यावेळी नुकतेच सातारा जिल्ह्याचे विभाजन झाले होते. पूर्वी सांगली सातारा जिल्ह्यात होती. आता द. सातारा हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. त्याचे मुख्य ठिकाण सांगली झाले. रामानंद भारती जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले तर वसंतदादांची जिल्हा काँग्रेसचे सेक्रेटरी म्हणून नेमणूक झाली. आता त्यांचे पूर्ण बिऱ्हाडच त्यांनी सांगलीत मांडले होते. काँग्रेस पक्षाचे काम आणि त्याचबरोबर सांगलीत अनेक छोटी- मोठी कामे वसंतदादा करत होतेच. तथापि त्यांची झेप मोठी होती.
 वसंतदादांनी उभी केलेली मोठमोठी कामे म्हणजे मार्केट यार्ड, साखर कारखाना व औद्योगिक वसाहत. ही त्यांची सर्वात मोठी स्मारके.
 वसंतदादांची विधायक कामे :

 स्वराज्य मिळाले त्यासाठी वसंतदादांनी आपल्या जीवाची बाजी लावून त्यांनी अहोरात्र कष्ट उपसले. स्वराज्य मिळाले म्हणजे सगळे काही झाले. आपले काम झाले असे त्यांना कधी वाटले नाही. आता कुठे परकीय सावकाराच्या ताब्यात असलेली जमीन आपण 'सोडवली' आहे. तिच्यावर भले-थोरले घर बांधून त्यामध्ये आपली सगळी माणसे

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / २१