पान:सयाजीराव - चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कन्यारत्न झाल्याचे बघून मल्हाररावांना अत्यानंद झाला. चार वर्षे बडोद्यात बेबंदशाही माजली, महाराणी जमनाबाई गव्हर्नर जनरलकडे तक्रार करत होत्या. शेवटी १३ जानेवारी १८७५ ला मल्हाररावांना ब्रिटिश सरकारने पदच्युत केले. जमनाबाईंना दत्तकपुत्र घेण्याची परवानगी दिली. तो दत्तक मात्र गायकवाड वंशाचा असावा आणि किशोरवयीन असावा, अशी घट घालण्यात आली. बडोद्यात गायकवाडांची चार मुले होती; पण त्यातील एक तीस, दोन अठ्ठावीस अन् चौथा पंचवीस वर्षाचे होते. जमनाबाई त्यावेळी बावीस वर्षांच्या होत्या. त्यामुळे बडोद्याबाहेरच्या गायकवाडांचा शोध घेतला. मालेगाव जवळच्या कवळाणे गावात पानिपतच्या युद्धानंतर प्रतापराव गायकवाडांच्या पिढीतील काशीराव शेती करत होते. ही माहिती नाशिकच्या कलेक्टरनी मिळवली. कवळाण्याच्या चार मुलापैकी गोपाळ दत्तकपुत्र म्हणून निवडल्या गेला. २७ मे १८७५ रोजी गुरुवारी दत्तक विधान व राज्यारोहण होऊन सयाजीराव तिसरे या नावाने राजा बनले.

अक्षरओळख नसलेल्या या राजाला लिहिणे, वाचणे, राजकारभाराचे शिक्षण सुरू झाले. केशवराव पंडित, भाऊ मास्तरांनी राजाचे शिक्षण सुरू केले. दिवाण टी. माधवरावांनी गव्हर्नरांकडे इंग्रजी शिक्षकाची मागणी केली. वर्हाड प्रांतातील शिक्षण खात्याचे संचालक मि. एफएएच इलियट या तरुण

अधिकाऱ्याची नेमणूक झाली. १० डिसेंबर, १८७५ ला बदोद्यात

सयाजीराव एक चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा / ९