पान:सयाजीराव - चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रुजू झाले. इलियट उत्साही होते. त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावर बृद्धिमत्तेची झाक होती. आल्या आल्या त्यांनी सहकारी शिक्षकाच्या मदतीने सयाजीरावाच्या अभ्यासक्रमाची आखणी केली. ब्रिटिश पब्लिक स्कूलच्या धर्तीवर आराखडा तयार केला. बारा वर्षांच्या सयाजीरावाची नवे शिकण्याची जिद्द, समजून घेण्याची चिकाटी बघून इलियट गुरुजींना समाधान झाले. या हिऱ्याला विविध पैलू पाडण्याचे काम सहा वर्षांत केले. अक्षर- अंकओळखीतून एक संवेदनशील किशोरवयीन राजा घडत गेला. बडोदा सार्वभौमत्वाचे बीजारोपण :
 अठराव्या वर्षी बडोदा राज्यकारभार हाती आलेल्या सयाजीरावांना गुरुवर्य एलियट यांनी बडोदा राज्याचा पूर्ण इतिहास नीट समजावून सांगितला. पेशव्याविरुद्ध आपणास मदत करणाऱ्या गायकवाडांशी ईस्ट इंडिया कंपनीने बडोदा संस्थानशी दोस्तीचा व सहकार्याचा हात पुढे केला. यातून ६ जून १८०२ रोजी ईस्ट इंडिया कंपनी व बडोदा राजे आनंदराव गायकवाड यांच्यात मित्रत्वाचा करार केला गेला. या कराराने ब्रिटिश कंपनी आणि बडोदा मित्र झाले. या करारात दोन तीनदा भर घालून इ.स. १८१८ ला तो कायम केला. यातील दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. बडोदा हे सार्वभौम पण ब्रिटिशांचे मित्र झाले. हिंदुस्थानातील लहान मोठी ५६५ संस्थाने ब्रिटिश सरकारचे मांडलिक झाले; पण बडोदा सरकार मूळ कराराप्रमाणे

ब्रिटिशांचे सार्वभौम मित्र राहिले. ही गोष्ट गुरुवर्य इलियट यांनी

सयाजीराव एक चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा / १०