पान:सयाजीराव - चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पानिपतच्या लढाईनंतर ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकार ब्रिटिश सरकारने हाती घेतले. यात मूळ १८०२ चा करार, आहे तसा स्वीकारला. मुंबईचे गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन २ एप्रिल १८२० रोजी बदोद्यात आले. त्यावेळी सयाजीराव दुसरे यांना गर्व्हनर म्हणाले, 'मी तुम्हास राज्यकारभार स्वतंत्रपणे करण्याची संपूर्ण सत्ता देण्यासाठी आलो आहे.' यापूर्वी इ.स. १८१८ ला मराठेशाहीचा पाडाव होऊन देशभर ब्रिटिश सरकारची सत्ता सुरू झाली होती. इ.स. १८५७ ला ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ब्रिटिश सरकारकडे आली होती. देशभरातील लहानमोठी ५६५ संस्थाने ब्रिटिश सरकारचे मांडलिक झाले होते. पण इ.स. १८०२, इ.स. १८१८ चा बडोदा व ब्रिटिश यांच्यातील मैत्रीचा मूळ करार आहे तसाच स्वीकारला गेला होता. याचा अर्थ बडोदा ब्रिटिश सरकारचे मित्र होते.

बडोदा गादीस वारस शोधणे :
 बडोदा येथे खंडेराव गायकवाड राजा होते. महाराणी जमनाबाईस मूलबाळ नव्हते. दुर्देवाने अल्पशा आजाराने इ.स. १९७० मध्ये खंडेरावांचे निधन झाले. त्यांचे बंधू मल्हारराव गादीवर आले. यावेळी खंडेरावांच्या पत्नी जमनाबाई गरोदर होत्या. मल्हाररावात राज्य सांभाळण्याचे गुण नव्हते. त्यांनी खंडेरावाच्या जवळच्या माणसांचा छळ सुरू केला. मल्हाररावाने रयतेचा जुलूम - छळ सुरू केला. अन्याय, अत्याचार आणि

भ्रष्टाचार वाढला. मधल्या काळात जमनाबाई प्रसूत होऊन

सयाजीराव एक चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा / ८