पान:सयाजीराव - चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनैतिक संबंध आहेत. याबद्दल मी सिव्हिल न्यायालयात अर्ज करून, डायव्हर्स मागणी करणार आहे. या प्रकरणात आपली बदनामी नको असल्यास एवढे हजार पौंड रक्कम देऊन तोड काढूया.” सयाजीराव या चारित्र्यहननाच्या धमकीला घाबरले नाही. ते म्हणाले, "तुला काय करायचे ते कर.” स्टॅथमने लंडनच्या सिव्हिल न्यायालयात पत्नी विरुद्ध घटस्फोटाचा दावा दाखल केला. पत्नी आणि सयाजीरावांचे अनैतिक संबंध असल्याने, मला तिच्याकडून घटस्फोट मिळावा. न्यायालयाने सयाजीरावास नोटीस पाठविली. नोटीस मिळताच ते आपल्या वकिलास म्हणाले, 'न्यायालयात अर्ज करा. बडोदा गायकवाड हे सार्वभौमराजे असून त्यांच्या विरुद्ध जगात कोणत्याही कोर्टात दावा दाखल करता येत नाही. वकिलांनी न्यायालयात तसा अर्ज केला. सिव्हिल न्यायाधीशांनी हे घटस्फोटाचे प्रकरण उच्च न्यायालयात वर्ग केले. लंडन हायकोर्टाने ब्रिटिश सरकारला आणि गायकवाड यांना नोटिसा काढल्या. महाराजा सयाजीराव यांच्या वकिलांनी हायकोर्टात अर्ज केला, “महाराजा सयाजीराव गायकवाड हे सार्वभौम राजा आहेत. लंडनच्या नागरी कायद्याने त्यांना बाधा करू शकत नसल्याने पुढील कार्यवाही करता येणार

नाही."

सयाजीराव एक चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा / १३