पान:सयाजीराव - चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही तर आपल्या अस्पृश्य-वंचित समाजाच्या उत्थानासाठी हिंदुस्थानात कायदा करून अंमलबजावणी करणारे सुप्रशासक होते. साहित्य, कला, संगीत, शिल्पकला ही राष्ट्राची संपत्ती आहे. या संपत्तीचे संवर्धन करणे राजाचे कर्तव्य समजून शेकडो कलावंत साहित्यिक, गुणवंतांना मदत करून ते सांस्कृतिक वारशांचे पोशिंदे झाले. राजाने स्वतः शिकून जनकल्याणाचा ध्यास घेतला तरच जनतेला मदत मिळू शकेल, हे ओळखणारे सयाजीराव स्वतः प्रज्ञावंत राजा होते. लक्ष्मी अन सरस्वती एका ठिकाणी गुण्या गोविंधाने कल्याणासाठी उपयोग करणारे छत्रपती शिवरायानंतरचे एकमेव राजा होते.
सयाजीराव चारित्र्यवान, निर्व्यसनी, सार्वभौम राजा :
 सयाजीराव हे निर्व्यसनी आणि चारित्र्यवान राजा होते. ज्या काळात भारतीय राजाराजवाडे रयतेच्या पैशात अन् त्यांच्या सत्तेच्या ऐशात बाई, बाटलीत आपल्या ऐश्वर्याचे उधळण करीत होते, त्यावेळी सयाजीराव या मोहापासून दूर राहून जनसेवेतच आपला मोक्ष शोधत होते. लंडन येथे हौसमौज करायला येणाऱ्या राजे मंडळींना या मोहात गुंतवण्याचे काम ईमेस्ट इमॅन्युअल स्टॅथम पत्नीच्या मदतीने करीत असे. याने पत्नीला सयाजीरावाच्या मागे लावले. या स्त्री मोहाच्या जाळ्यात सयाजीराव अडकले नाही, गि-हाईक हातचे जातेय या भावनेने चिडलेल्या स्टॅथमने सयाजीराव यांना वकिलाच्या मार्फत

नोटीस पाठवली. त्यात लिहिले, “आपले माझ्या पत्नीशी

सयाजीराव एक चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा / १२