पान:सयाजीराव - चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजा सयाजीराव यांच्या मनावर पक्के बिंबविल्यामुळे या राजाने आयुष्यभर बलाढ्य ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करत स्वातंत्र्ययोद्ध्याचे ते पाठीराखे झाले. सयाजीराव हे सार्वभौम राजा आहेत हे पुढे इ.स. १८१२ साली लंडन हायकोर्टाने आणि तेथील सुप्रीम कोर्टाने एका निवाड्यात जाहीर केले, ही रंजक गोष्ट सयाजीरावांचा ते चारित्र्यवान राजा हा दुसरा पैलू दाखवून देते.
जनसेवा आणि गरजूंच्या दानधर्मातच मोक्ष शोधणारा राजा :
 स्वातंत्र्यपूर्व काळात रयतेच्या पैशावर हौस मौज आणि ऐश्वर्याची पोळी भाजणाऱ्या राजांचीच फार मोठी संख्या होती; पण त्यात अपवाद असणारे होते सयाजीराव. या दूरदर्शी राजाने महसूल वसूलीकडे जसे लक्ष दिले, त्याहून अधिक लक्ष राजवाडा, आजूबाजूच्या खानगी खर्चात काटकसर करून राज्याचा कोश वाढविला. त्यामुळेच काही लाखाच्या तोट्यात असलेले बडोदा पंचवीस वर्षात जगात सातव्या क्रमांकाचे श्रीमंत झाले. या श्रीमंतीचा उपयोग जनतेला शिक्षण, आरोग्य, शेती उद्योगास जेवढी मदत केली, त्याहून देशभरातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत मदत केली. यातील विद्यार्थी आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे सारखे हजारो विद्यार्थी या विद्यार्थ्यांना ८९ कोटी रुपयांची शिष्यवती

देणारे महाराजा सयाजीराव एकमेव दानशूर राजा होते. एवढेच

सयाजीराव एक चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा / ११