Jump to content

पान:सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक लक्ष रुपये व विवाहाच्या तारखेपासून त्या रकमेवरचे व्याज शाहूंना देऊन, हा प्रश्न मिटला. (उपरोक्त खंड-५, ५९५).
२ : २ महाराजा सयाजीरावांचे वेगळेपण :
 चौसष्ट वर्षांच्या राज्यकारभारात जवळजवळ बावीस वर्षे सयाजीराव जगप्रवासाच्या निमित्ताने बडोद्याबाहेर राहिले. जगातील सर्व महत्त्वाच्या देशांना त्यांनी भेटी दिल्या. त्या देशाचे वेगळेपण हेरले. जगातील मान्यवर पुढाऱ्यांच्या, विचारवंतांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या. यातून त्यांना विश्वदर्शन घडले. तेथील चांगल्या गोष्टी बडोद्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे, हे ओळखलेल्या या प्रज्ञावंत आणि विचारवंत राजाने आयुष्यभर पुस्तकांशी मैत्री केली.
 जगभरातून उत्तम ग्रंथ आणून वाचले. स्वतः अभ्यास केला. आशिया खंडातील सर्वांत मोठी 'सेंट्रल लायब्ररी' बडोद्यात उभी केली. स्वातंत्र्यपूर्व काळात पंचाहत्तर हजार लेखी हुकूम काढले. तयार केलेले कायदे छापले. हा हिंदुस्थानच नव्हे तर तो जगातील एका राजाचा साठ वर्षांच्या राज्यकारभाराचा विक्रम होता.

 साहित्य, कला, शिल्पकला, संगीत हे समाजसंस्कृतीचे आधारस्तंभ आहेत, हे सयाजीरावांनी ओळखून या सर्व क्षेत्राला सढळ हाताने साहाय्य केले. एवढेच नाही तर कला आणि विज्ञानाचा विकास हे लोकांच्या सर्वांगीण समृद्धीची, प्रगतीची शिडी आहे. त्याकरिता सर्वांना मदत करणे हे राजाचे कर्तव्य

सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती / २२