समजून या राजाने आयुष्यभर कलावंतांना, प्रज्ञावंतांना, देशप्रेमी लोकांना आणि क्रांतिकारकांना कोट्यवधींची आयुष्यभर सढळ हाताने मदत केली.
नामदार गोखले, न्या. रानडे, जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर, सुभाष बाबू, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, म. गांधी, महर्षी शिंदे, योगी अरविंद, पंडित मालवीय, रियासतकार देसाई आणि आणखी हजारोंना बडोद्यातून मदत मिळाली. आजच्या महाराष्ट्रातील ऐंशी टक्क्यांहून अधिक बहुजनांच्या शिक्षण संस्था सयाजीराव गायकवाडांच्या प्रत्यक्ष मदतीने व प्रेरणेने सुरू झाल्या, असा इतिहास आहे.
शाहू छत्रपतींनी वेगवेगळ्या जातींच्या मुलांसाठी वसतिगृह करून शिक्षणाची गंगा गरीब मुलांना उपलब्ध करून दिली. हे कामही फार महत्त्वाचे आहे. बहुजनसमाज शिकला पाहिजे ही त्यांची कळकळ होती. त्यामुळेच भाऊराव पाटलांना त्यांनी मदत केली.
हिंदुस्थानातील एक विचारवंत राजा ही सयाजीरावांची ओळख जगाला होती. त्यामुळेच दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद शिकागो, पाचवी जागतिक मानवंश परिषद, ऑक्सफोर्ड लंडन, जागतिक प्राच्यविद्या परिषद, अ.भा. हिंदी साहित्य संमेलन दिल्ली, अ.भा. साहित्य संमेलन कोल्हापूर, अ.भा. आर्यसमाज संमेलन, अ.भा. सामाजिक परिषद मुंबई, अ.भा हिंदी औद्योगिक