Jump to content

पान:सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सयाजीराव भाषणातून, बोलण्यातून सांगत असत, ऐपत असलेल्या मंडळींनी लग्नसमारंभाच्या निमित्ताने एक दुसऱ्यांची अडवणूक करू नये. खासेरावांनी प्रयत्न केला; पण हा आकडा कमी न झाल्याने सयाजीरावांनी संमती दिली. अंतिम बोलणी नक्की करण्याचे ठरविले. दरम्यान ११ जुलै, १९१७ ला शाहूंनी खासेरावांना कळविले, 'आम्ही मूळ मागणी अकरा लक्ष रुपयांची केली होती. महाराजांनी ६,७०,००० मान्य केले. यावर एक लक्ष तीस हजार वाढवून द्यावेत. म्हणजे आम्हाला आठ लक्ष मिळावेत.' (उपरोक्त खंड, ३४६). वाढीव मागणीस सयाजीरावांनी खळखळ केली. खासेराव शाहूंचे जवळचे मित्र आणि सयाजीरावांचे विश्वासू अधिकारी-नातेवाईक होते. त्यांनी दोघांना समजावून विवाहाचा मुहूर्त ठरविला.

 बडोदा शाही विवाहाच्या तयारीत लागले. वऱ्हाड आले. भव्य स्वागत झालं. शाही विवाह पार पडला. वर-वधूस एक गाव वतन देण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने, शाहूंनी त्याबद्दल रोख दोन लक्ष रुपयांची मागणी केली. काही पैसे त्याच दिवशी दिले गेले. विवाहानंतरचे विधी पार पडले. शाही वऱ्हाड कोल्हापूरला परतले. एक लक्ष रुपये बाकी राहिले होते. कोल्हापूर दिवाणांनी या रकमेकरिता स्मरणपत्रे पाठविली.

 सयाजीरावांना या शेवटच्या बाकी व्यवहाराची कल्पना नव्हती. शाहूंनी याबद्दल सयाजीरावांना कळविले. या पेचप्रसंगात पुन्हा खासेरावांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. देणे बाकी असलेले

सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती / २१