पान:समता (Samata).pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घर दोधाचे ग्रामीण भागातील घरांची नोंदणी पति-पत्नी यांच्या संयुक्त नावे करण्या बाबत... | महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व जल संधारण विभाग शासन परिपत्रक क्र. व्ही.पी.एम. २६०३/प्र.क्र. २०६८/पॅरा-४ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक २० नोव्हेंबर २००३ परिपत्रक महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी त्यांना पतीच्या मालमत्तेमध्ये हक्क देणे ही मूलभूत गरज आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पति-पत्नि यांना एकरुप एक घटक मानला जातो व प्राप्त संपत्ती दोघांची असल्याचे मानले जाते. त्यामुळे स्त्रीयांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी त्यांच्या असलेल्या घरांची नोंद पति-पत्नी दोघांच्या नावे असणे आवश्यक आहे. ब-याच वेळा पतीच्या निधनानंतर पतीच्या मालमत्तेमध्ये हक्क प्रस्थापित करताना महिलांना अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते. जर आधीच पति-पत्निचे हक्क महसुली दप्तरात असेल तर अशा अडचणी येणार नाहीत. यासाठी सुरुवात म्हणून पति आणि पत्नीच्या संयुक्त नावे ग्रामीण भागातील घरांची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. महाराष्ट्र कर व फी नियम १९६० चे भाग-३ मध्ये कर आकारणी संदर्भात कार्यपध्दती विहित केलेली आहे. सदर कार्यपध्दतीला अनुसरुन लेक लाडकी अभियान शिरुर (का) (३१)