पान:समता (Samata).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना यापुढे ग्रामीण भागातील घराच्या नोंदी फॉर्म ८ मध्ये पति व पत्नी यांच्या संयुक्त नावाने कराव्यात. त्यासाठी प्रस्तुत नियमाच्या भागामध्ये विहित केलेल्या कार्यपध्दतीप्रमाणे सूचना व हरकती मागवून ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन सदर नोंद पती व पत्नी यांच्या संयुक्त नावाने करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी. सदर कार्यवाही तात्काळ पूर्ण करुन त्याबाबतची प्रमाणपत्रे सर्व ग्रामपंचायतीतील प्रत्येक घरी कोणत्याही परिस्थितीमध्ये डिसेंबर २००३ अखेर पर्यंत देण्याची व्यवस्था करावी. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी आवश्यक आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार वा नावाने कुंदा गोसावी उपसचिव महाराष्ट्र शासन ।। लेक लाडकी अभियान शिरुर (का) (३२)