पान:समता (Samata).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • शिक्षेची तरतूद ••• | कलम ७ नुसार या कायद्याचा भंग करणा-या सर्वांना दोन वर्षे सक्त मजुरी आणि रु. २०००/- दंडाची शिक्षा करण्यात आली आहे. दुस-यांदा हा गुन्हा घडल्यास ५ वर्षे सक्त मजुरी आणि रु. ५००००/- पर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
  • तक्रार कोणाकडे कराल? | कलम ५ नुसार राजपत्रित अधिकारी सदर प्रकरणे हाताळण्यासाठी नेमण्यात आलेले आहेत. सदर प्रकरणाचा शोध घेण्याचा आणि जप्तीचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. अश्लिल आणि मान हानिकारक स्त्रीयांचे प्रदर्शन घडविणा-या जाहिराती, प्रकाशन, लिखाण, चित्रकला चित्रफित काही आक्षेपार्ह आढळल्यास त्वरीत या राजपत्रित अधिका-याकडे अथवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करु शकतो.

लेक लाडकी अभियान शिरुर (का) (२६)