पान:समता (Samata).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सायबर गुन्ह्यांपासून महिलांचे संरक्षण

  • कायदा काय सांगतो.००

| इंटरनेट, मोबाईल फोन, ईमेल, या अत्याधुनिक दळण वळणाच्या माध्यमातून » * महिलांना हेतुपुर्वक त्रास देणे म्हणजेच सायबर । गुन्हे. या साधनांचा वापर महिलांचे असभ्य चित्रण, त्यांना लैंगिक अत्याचाराची धमकी देणे, त्यांच्या विरुध्द अश्लिल शेरेबाजी करणे हा गुन्हा आहे. गैरमार्गाने किंवा बेकायदेशीरपणे दुस-या कोणाची डिजीटल सही, पासवर्ड, किंवा विशिष्ट ओळखीचा नमुना चोरुन वापरला तर तो सायबर गुन्हाच आहे. खाजगी व्यक्तीच्या परवानगी शिवाय मोबाईल किंवा अन्य तशा साधनांव्दारे प्रतिमा काढून दुस-याला पाठविणे हा गुन्हा आहे. | कोणत्याही प्रकारची बिभित्स माहिती इंटरनेटवर प्रस्तुत करणे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, डिजीटल प्रतिमा यातून अशा आशयाचा मजकूर पाठविणे, डाऊनलोड करणे, जाहिरातीत वापरणे, देवाणघेवाण करणे हा गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीचा ऑनलाईन सतत पाठलाग करणे, संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे, एखाद्या व्यक्तीवर सतत लक्ष ठेवणे ज्यामुळे तिला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल, मनात भय निर्माण होईल. तर तो ही गुन्हाच आहे. लेक लाडकी अभियान शिरुर (का) (२७)