पान:समता (Samata).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्त्रीयांचे अश्लिल प्रदर्शन प्रतिबंधक कायदा १९८६

  • कायदा काय सांगतो

अश्लिल आणि मानहानिकारक स्त्रीयांचे प्रदर्शन घडविणाच्या जाहिराती, प्रकाशन, लिखाण, पेंटींग, सिनेमे, मोबाईल अगर इतर कोणत्याही प्रकारे स्त्रीयांचे अश्लिल प्रदर्शन प्रतिबंध करणारा हा कायदा आहे. या कायद्यानुसार स्त्री शरीराच्या कोणत्याही अवयवाचे प्रदर्शन कोणत्याही पध्दतीने घडविण्याला प्रतिबंध केला आहे. | लिखाण, चित्र, पेंटींग, फिल्म व इतर कोणताही प्रकार वापरुन त्याचे वितरण करणा-याला आणि प्रकाशन करणा-याला बंदी घालण्यात आली आहे. सिनेमॅटोग्राफी १९५२ हा देखील या कायद्यासोबत चित्रपटांना लागू करण्यात आला आहे. | राजपत्रित नेमलेला अधिकारी कारवाई करुन संबंधीत साहित्याचा शोध घेऊन जप्त व पंचनामा करुन कोर्टासमोर केस दाखल करु शकतो. लेक लाडकी अभियान शिरुर (का) (२५)