पान:समता (Samata).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थापता येतील. खटल्यांचे निकाल शक्यतो लवकर, म्हणजे एक वर्षाच्या आत लावावेत असे निर्देश दिले आहेत. खटल्यांचे कामकाज व तपास संवेदनशीलतेने व्हावा, मुलांची ओळख गुप्त रहावी, मुलांची शारीरिक तपासणी त्यांच्या पालकांच्या किंवा विश्वासातील व्यक्तिच्या उपस्थितीत व्हावी, पीडित मुलांचे योग्य पुनर्वसन करावे असेही स्पष्ट निर्देश आहेत.

  • शिक्षेची तरतूद••• गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार या कायद्याने वेगवेगळ्या शिक्षा ठरविल्या

आहेत. त्या पुढीलप्रमाणे : * संभोग (कलम ३) : कमीत कमी ७ वर्षे कैद ते जन्मठेप, आणि दंड (कलम ४) * जबरी लैंगिक संबंध (कलम ५) : १० वर्षे कैद ते जन्मठेप अधिक दंड ( कलम ६) * लैंगिक अत्याचार (कलम ७) : ३ ते ५ वर्षे कैद आणि दंड (कलम ६) । * जबरी लैंगिक अत्याचार (कलम ९) : कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त ७ वर्षे कैद आणि दंड (कलम १०)

  • तक्रार कोणाकडे कराल?

अशा प्रकारच्या गुन्ह्याचा शोध घेऊन कार्यवाहीसाठी स्वतंत्र अधिकारी प्रत्येक पोलीस स्टेशनला नेमण्यात आलेला आहे. लेक लाडकी अभियान शिरुर (का) (२०)