पान:समता (Samata).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण करणारा कायदा २०१२

  • कायदा काय सांगतो..

लहान मुले लैंगिक गुन्ह्यांचे सहज लक्ष्य बनू शकतात. अगदी तान्ही मुलगीसुद्धा लैंगिक अत्याचाराची शिकार बनल्याच्या घटना घडतात. मुलांचा व्यापार आणि बालवेश्या व्यवसाय यासारखे भयानक गुन्हेही आपल्या समाजात घडतात. याच्या विरोधात अनेक कायदे, योजना आहेत. तसेच बालकल्याण संस्थाही आहेत. मात्र प्रत्येकच व्यक्तीने अशी घृणास्पद कृत्ये रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शाळांमधून नैतिक शिक्षणाचे धडे प्रभावीपणे दिले तर भावी पिढी एकमेकांचा आदर करायला शिकेल. या कायद्याने १८ वर्षांखालील मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ आणि त्यांच्याबरोबर लैंगिक वर्तन आणि अशलील बालवाङ्मयाची निर्मिती हे गुन्हे मानले आहेत आणि त्यांच्या संरक्षणाची तरतूद केली आहे. अशा अल्पवयीन मुलांची संमती हा मुद्दा इथे गैरलागू आहे. गुन्ह्याच्या व्याख्येत लैंगिक अवयवाबरोबरच इतर कोणत्याही अवयवाचा किंवा वस्तूचा लैंगिक कृत्यासाठी जबरदस्तीने वापर याचाही समावेश करण्यात आला आहे. | या कायद्याने मुलगा-मुलगी असा भेद केलेला नाही. आधीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून प्रथमच शिक्षेची तरतूद केली आहे. या कायद्यान्वये अशा गुन्ह्यांचे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायलये लेक लाडकी अभियान शिरुर (का) (१९)