पान:समता (Samata).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोफत कायदेशीर सल्ला मिळतो. गरज भासल्यास भा.दं. वि. कलम ४९८ अ खाली तक्रार दाखल करता येते. हिंसाग्रस्त महिलेला किंवा मुलीला घरात राहण्याचा हक्क संरक्षणाचा आदेश, निवासाचा आदेश, आर्थिक लाभ, मुलांच्या ताब्याचा आदेश नेमलेल्या संरक्षण अधिका-याच्या मदतीने न्यायालयाव्दारे त्वरीत मिळू शकतो. । | कौटुंबिक हिंसाचारग्रस्त व्यक्तिला स्वाधार गृहांमध्ये निवारा आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्याची तरतूद आहे. कलम १६ अन्वये या गुन्ह्याच्या खटल्याची सुनावणी ‘इन-कॅमेरा घेता येते. अशा प्रकरणांची सुनावणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी किंवा महानगर दंडाधिकारी यांच्या अखत्यारित येते. निकालावरील अपील सत्र न्यायालयात, वादी आणि प्रतिवादी यांना निकालाची लेखी प्रत प्राप्त झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करता येते.

  • तक्रार कोणाकडे कराल?

| प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी आणि शहराच्या ठिकाणी संरक्षण अधिकारी हिंसाग्रस्त महिलेला मदत मिळण्यासाठी नेमण्यात आलेले आहेत. त्यांच्या मदतीने न्यायालयात हिंसेविरुध्द दाद मागता येते. लेक लाडकी अभियान शिरुर (का) (१८)