पान:सभाशास्त्र.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संभाशास्त्र ९२

        • -••••••••••

१२:३४, २९ मार्च २०१८ (IST)~.. तो सभासद झाला अशी स्थिति असते. या स्थितीत गणसंख्या ठरवितांना एकंदर सभासदांचे संख्येपेक्षां विचारविनिमय व चर्चा योग्य तहेनें कशी होईल याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. कांहीं तरी गणसंख्येबाबत नियम असणे अवश्य आहे. जेथे गणसंख्येबाबत नियम नाहीं–तेथे एकंदर सभासदांपैकी ५१ टक्के सभासदांची गणसंख्या मानली जाते. सभा म्हणजे बहुमतानें काम करणारी घटना, म्हणून बहुमत हजर असल्याशिवाय काम विधियुक्त होणार नाही हा सर्वमान्य सिद्धांत येथे लागू पडतो. नियम असला म्हणजे नियम प्रभावी ठरतो. अध्यक्षाने स्थानापन्न होण्यापूर्वी गणसंख्या उपस्थित आहे की नाही हे प्रथम पाहावे. गणसंख्या पाहणे हे अध्यक्षाचे कर्तव्य आहे. गणसंख्या नसेल तर सभा विधियुक्त संघटित झाली असे म्हणता येत नाहीं. वास्तविक गणसंख्या हजर नाही, पण सभेची वेळ झाली तर अध्यक्षाने स्थानापन्न व्हावें कीं नाहीं, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कॉमन्स सभेचा अध्यक्ष कोरम हजर आहे हे पाहिल्याशिवाय स्थानापन्न होत नाही. तो स्थानापन्न झाला म्हणजे कोरम झाले, सभा सजली (House is made ) असे समजले जाते. तथापि अध्यक्ष कोरम असल्याशिवाय स्थानापन्न होत नाहीं. सभेची वेळ होताच तो पाहतो, गणसंख्या नसेल तर नियमाप्रमाणे ठराविक काल थांबतो. नंतर पुन्हा पाहतो व गणसंख्या नसेल तर दुस-या दिवसापर्यंत सभा तहकूब करतो. सभेची वेळ होतांच अध्यक्षानें अगर चिटणिसाने गणसंख्या आहे की नाहीं हे पाहावे. गणसंख्या नसेल तर नियमाप्रमाणे थांबावे व नंतर पुन्हा पाहावें व गणसंख्या नसेल तर नियमाप्रमाणें सभा पुढे ढकलावी. सुरूच न झालेली सभा तहकूब केली असे म्हणता येत नाही. साधारणपणे सभेचे जाहीर वेळेपासून अर्धा तास वाट पाहावी. तेवढ्या वेळांत गणसंख्या न जमली तर सभा पुढे ढकलला आहे. असे अध्यक्षानें स्थानापन्न न होतांच उभे राहून जाहीर करावे. कांहीं प्रसंगी गणसंख्या वेळेवर उपस्थित न झाल्यास सभा अजीबात रद्द करण्याचा अधिकार असतो. उदाहरणार्थः-- सभासदांनीं यादी देऊन बोलावण्यास लावलेली सभा ( Meeting called apon requisition ) म्हणजे प्रार्थित सभा, वेळेवर गणसंख्या उपस्थित न झाल्यास रद्द ठरविता येते. गणसख्येच्या अभावीं पुढे ढकललेली सभा जेव्हां भरते तेव्हां गणसंख्येची आवश्यकता तिला नाहीं. वेळेवर जे सभासद व