पान:सभाशास्त्र.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९१ सभानियमन व संचालन नियमाप्रमाणे जरी योग्य ठरले तरी अध्यक्षाने आक्षेपकाचे सभेतील तेथपर्यंत भाग घेणारे वर्तन लक्षात घेऊनच योग्य तो निर्णय दिला पाहिजे. सभेच्या विधियुक्ततेबद्दल सभा-सुरवातीस आक्षेप घेण्यावाबत स्पष्ट नियम असावा. नियमाभावी सभाकार्य सुरू झाल्यानंतर घेतलेला आक्षेप व्यर्थ ठरविणेंच न्याय्य ठरते. | गणसंख्या ( कोरम ) :–संस्थांचे हजारों सभासद असतात; तथापि सभेला सर्वच कांहीं हजर राहू शकत नाहींत. सार्वजनिक सभेला सर्वांना यण्याचा हक्क असल्याने किती इसम हजर असले म्हणजे समा सुरू करावी असा नियम करणे अवघड आहे. म्हणून गणसंख्या अगर कोरमचा नियम तेथे लागू नाहीं. उलट संस्थेचे सभासद किती आहेत हे निश्चित असते म्हणून ती संख्या लक्षात घेऊन, संस्थेचे स्वरूप व कार्य लक्षात घेऊन किती सभासद हजर असले म्हणजे काम सुरू करावे हे ठरविणे शक्य होते. सभा म्हणजे चर्चा व विचारविनिमय व त्यांतून स्पष्ट होणारे निर्णय हे लक्षात घेऊन ही संख्या ठरविली पाहिजे. ही किमान संख्या घटनेने अगर नियमाने ठरलेली असते. या किमान संख्येइतके सभासद हजर असतील तरच सभाकार्य सुरू करता येते व चालू ठेवता येते. ही किमान संख्या म्हणजे गणसंख्या अगर कोरम ( Quoram ) होय. सभेला प्रातिनिधिक स्वरूप प्राप्त व्हावे व सभाकायत जबाबदारी असावी म्हणून संख्थेचे एकंदर सभासद व ही गणसंख्या यांत कांहीं प्रमाण असावे लागते. म्युनिसिपालट्या, लोकल बोर्डे, पंचायती यांत सामान्यतः एकंदर सभासदांपैकी ३ सभासदांचे कोरम असते. येथील मध्यवर्ती विधिमंडळांत व प्रांतिक विधिमंडळांत हे प्रमाण सामान्यतः } पडते. ब्रिटिश पार्लमेंटच्या कॉमन्स सभेचे सभासद् ६१२ असून केवळ ४० सभासदांचे कोरम तेथे आहे. ज्या संस्था नागरिकांच्या स्वेच्छेने अस्तित्वात आल्या आहेत त्या सर्वांत गणसंख्या ठरवितांना वरील दृष्टीने प्रमाण ठरविणे अवघड असते. म्युनिसिपालिटया, लोकल बोर्डे, कॉर्पोरेशन, विधिमंडळे यांच्या सभासदांची संख्या कायद्याने निश्चित व मर्यादित असते. या सर्व संस्था कायद्याने अस्तित्वात आलेल्या ( Statutory bodies ) असतात. उलट नागरिकांच्या स्वेच्छेने अस्तित्वात आलेल्या संस्था, मग त्या नोंदलेल्या असोत अगर नसोत, सभासदांच्या संख्येला क्वचितच मर्यादा घालतात. जो भाग विकत घेईल तो कंपनीचा सभासद झाला. जो वर्गणी भरील, ध्येय मान्य करील,