पान:सभाशास्त्र.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३ सभानियमन व संचालन •••••••••••••••••••• •••••••••••••••• •••••••••••••••••••••••• ~~ जेवढे सभासद हजर असतील ते कायदेशीर रीतीने सभाकार्य करू शकतात. पुढे ढकललेल्या. सभेची नोटीस प्रत्येक सभासदाला देण्याचे कारण नाहीं. नियमांत असेल त्याप्रमाणे त्या दिवशी ती भरेल अगर नियमांत कांहीं उल्लेख नसेल तर अमुक दिवशी, अमुक वेळी, अमुक स्थानीं ती भरेल एवढे योग्य रीतीने जाहीर केलें म्हणजे पुरते. जेव्हां गणसंख्या उपस्थित असून अध्यक्ष सभेच्या संमतीने सभा तहकूब करतो त्या वेळी सभा तहकूब झाली असे म्हणणे योग्य आहे. गणसंख्या असल्याशिवाय अध्यक्ष हा सभेचा अध्यक्षच होऊ शकत नाही. तो स्थानापन्न झाला म्हणजे सभा सजली, काम विधियुक्त करण्यास तिला अधिकार प्राप्त झाला. केवळ गणसंख्येइतकीच सभासदसंख्या आहे म्हणून पुष्कळ वेळां सभा तहकूब करणे इष्ट ठरते. तथापि केवळ सभासद गणसंख्येइतकेच आहेत, थोडे आहेत, होणारी सभा प्रातिनिधिक होणार नाही या सबवावर अध्यक्षाला सभा आपले अधिकारांत तहकूब करतां येत नाही. सभा तहकूब करण्याचा हक्क, सभेचा आहे. सभा जेव्हा तहकूब करण्यांत येते तेव्हां तहकूबसभा केव्हां भरणार हेही ठरविले जाते. म्हणून तहकुबसभेची पुन्हा नोटीस देण्याचे कारण नाही. अनिश्चित काल सभा तहकूब झाल्यास ती केव्हां भरणार याबद्दल योग्य नोटीस दिली पाहिजे, तहकूबसभा म्हणजे तीच संभा समजली जाते, तिचेच काम करावयाचे असते म्हणून मूळ सभेच्या कार्यक्रमपत्रिकेंत, अगर नोटिशीत नसलेली नवीन बाब तहकूबसभेत विचारांत घेता येत नाही. | गणसंख्या उपस्थित आहे हे पाहुन अध्यक्षाने स्थानापन्न व्हावे, व स्थानापन्न झाल्यानंतर पुन्हा एकदां गणसंख्या आहे याची खात्री करून घ्यावी. अध्यक्ष खुर्चीवर बसतांच सभा सुरू न व्हावी या हेतूने अनेक सभासद सभास्थान सोडून जातात व कोरम होऊ देत नाहींत. खुर्चीवर बसून अध्यक्षाने गणसंख्या आहे हे पाहुन काम सुरू केले म्हणजे ठीक असते. एकदा सभा सुरू झाल्यानंतर गणसंख्या आहे की नाही हे पाहण्याचे काम अध्यक्षाचे नाहीं. सभा चालू झाल्यानंतर सभाकार्य विधियुक्त होण्यासाठी सभा संपेपर्यंत गणसंख्या असावयास पाहिजे. तथापि ही आहे की नाही हे पाहण्याचे काम सभासदांचे आहे. जोपर्यंत गणसंख्या नाहीं हा आक्षेप कोणी घेत नाहीं तोंपर्यत अध्यक्षाने आपण होऊन आक्षेप घेऊन सभा तहकूब करण्याचे कारण नाहीं. सभेचे काम उरकावयाचे आहे हे लक्षात घेऊन ते चालू ठेवावे. गण