पान:सभाशास्त्र.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ९० -war अशी दृष्टि ठेवावी. प्रास्ताविक भाषणाने सभाकार्य शांततेने होईल असे वातावरण निर्माण करावे. जेथे अध्यक्ष केवळ सभानियंत्रक आहे तेथे प्रास्ताविक भाषणाची अर्थात् जरूरी नाहीं. प्राथमिक आक्षेपः–अध्यक्ष स्थानापन्न होतांच अगर त्याचे प्रास्ताविक भाषण संपताच सभेच्या विधियुक्ततेबद्दल आक्षेप घेतले पाहिजेत. नोटीस, तीतील मजकूर, सभेची वेळ, सभेचे स्थळ, नोटिशीची प्रसिद्ध, अध्यक्षांची निवड अगर योजना यासंबंधीचे आक्षेप सभाकार्य सुरू होण्यापूर्वीच घेतले पाहिजेत. आक्षेपकाने संस्थेच्या घटनेतील नियम दाखवून आक्षेप थोडक्यांत मांडावा. त्यावर कार्यकारी मंडळाला अगर व्यवस्थापक समितीला उत्तर देण्यासाठी अध्यक्षाने त्यास पाचारण करावे, वाटल्यास त्यावर थोडी चर्चा होऊन द्यावी; व नंतर साधकबाधक कोटिक्रम लक्षांत घेऊन, घटनेतील प्रस्तुत नियम लक्षात घेऊन निर्णय द्यावा. सभा जर विधियुक्त रीतीने संघाटत झाली नसेल, नियमाविरुद्ध स्पष्टपणे तिचे वर्तन झाले असेल तर ती सभा गैरकायदा नियमाविरुद्ध आहे असा निर्णय द्यावा. नियमाप्रमाणे बहु अंशाने सर्व गोष्टी झाल्या असून सभा कायदेशीर व विधियुक्त धरल्याने कोणताही विशेष अन्याय होत नसेल तर सभा रीतसर व कायदेशीर आहे, असा निर्णय देणे योग्य आहे. जी गोष्ट उघड गैरकायदा आहे ( Illegal ) ती तशी मान्य केलीच पाहिजे. जी गोष्ट गैरकायदा नाही पण नियमाचे दृष्टीने थोडीशी गैर आहे ( irregular ), पण त्या योगाने विशेष अन्याय होत नसेल तर ती गैरकायदा मानून सभा गैरकायदा ठरविणे योग्य नाही. नियमाप्रमाणे नोटीसच जर काढली नसेल, अगर सर्व सभासदांकडे धाडली नसेल तर ही गोष्ट उघड गैरकायदा आहे म्हणून सभा गैरकायदा ठरविणे प्राप्त आहे. उलट नोटीस काढलो आहे; पण जे परदेशी आहेत, दुर आहेत व येऊ शंकणार नाहीत त्यांना धाडली नाहीं तर हे थोडे गैर असले, नियमाविरुद्ध असले तरी गैरकायदा होत नाहीं, व तेवढ्यासाठी सभा बेकायदेशीर ठरविण्याचे कारण नाहीं. सभा चालू ठेवण्यांत कोणावर अन्याय होत नसेल तर गैर गोष्ट गैरकायदा मानण्याचे कारण नाहीं. वर उल्लाखलेले आक्षेप सभाकाये सुरू झाल्यानंतर घेतल्याने आक्षेपकाचे प्रामाणिकपणाला बाध येतो. आक्षेप वेळीच न घेण्याने, सभाकार्य होण्याला संमति मिळाली असा निष्कर्ष काढण योग्य ठरते. सभा संपण्याचे वेळी सभेच्या विधियुक्ततेबद्दल आक्षेप घण