पान:सभाशास्त्र.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८९ सभानियमन व संचालन नियमांत दिलेला असला तरच त्याचा उपयोग त्याला करता येईल. केवळ अध्यक्ष या नात्याने जादा मत मिळते असा कायदा नाहीं, अगर संकेतही नाही. त्याचे सभासद या नात्याने असलेले मत (Deliberative Vote ) सुद्धा त्याने समसमान मते पडत असतील तर देऊ नये. कारण समसमान मते पडली म्हणजे त्याला नियमाप्रमाणे जादा मत (Casting Vote.) देण्याचा अधिकार उत्पन्न होतो; व या परिस्थितीत सभेचा निर्णय म्हणजे केवळ त्याचा निर्णय असे स्वरूप प्राप्त होते. जादा मत देण्याचा प्रसंग आला तर विद्यमान परिस्थितीचे ( Status quo ) बाजूने द्यावे. म्हणजे ठरावापूर्वीची स्थिति कायम राहील असा त्याचा परिणाम व्हावा. हा संकेत सर्वमान्य आहे. आपली विचारसरणी केव्हाही तो चर्चेत अगर तिचे समारोपांत दिग्दर्शित करू शकतो, । अध्यक्षाच कर्तव्यें व अधिकार यांचा निर्देश बहुशः संस्थेच्या घटनेत असतो. घटनेतील नियमाप्रमाणे सभाकार्य चालावे म्हणून केलेले नियम स्पष्ट व असंदिग्ध असावेत. नियमानुसार अध्यक्षाला अधिकार प्राप्त होतात, म्हणून नियमांचे योग्य ज्ञान त्याला असणे अवश्य आहे. संस्थांचे नियम वाटेल तेव्हां बदलता येत नाहींत, शिवाय नियम बदलण्याचे तंत्रही बहुशः किचकट असते. या दृष्टीने विचार करत असाधारण परिस्थितीत कसे वागावे यासंबंधीही अधिकार त्याला नियमांत दिलेले असतात. सामान्य नियम व नेहमींचे संकेत बाजूला ठेवून असाधारण व बिकट प्रसंगी योग्य तन्हेने कार्य होण्यासाठी, ते तहकूब करण्याची व्यवस्था बहुशः नियमांत असते. या बावर्तीत अगर अन्य बाबतींत जेथे नियम नसेल, अपुरा असेल, अगर त्याने मार्गदर्शन होत नसेल तर देशांतील मुख्य विधिमंडळांतील कामकाजाचे दाखले पाहुन, अध्यक्षाला वागण्याचा अधिकार आहे. संस्थेचे नियम, संकेत, दाखले, व मुख्य विधिमंडळांतील रीतिरिवाज या साधनचतुष्टयाने अध्यक्षाला योग्य व | जरूर ते अधिकार लाभत असतात. | अध्यक्षाचे प्रास्तविक भाषणः–संस्थेचे स्वरूप व सभेचे कार्य लक्षांत घेऊन अध्यक्षाने प्रास्ताविक भाषण करावे. वार्षिक सभा असेल तर गतसालचे थोडक्यांत समालोचन करावे, असाधारण सभा असेल तर विषयाचे महत्व व मुख्य मुद्दे थोडक्यात सांगावेत. चर्चेला येणाच्या विषयांचे दिग्दर्शन करावे, स्वतःचे मत योग्य प्रसंगी थोडक्यांत निर्दिष्ट करून इष्ट ते वळण चर्चेला लागेल