पान:सभाशास्त्र.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ८६

सर्वमान्य कर्तव्ये ठरली आहेत. सभेचे योग्य नियंत्रण, सभाकातील नियमबद्धता व सभेने निर्णय घेण्याची आवश्यकता या दृष्टीने हीं कर्तव्यें अवश्य अशीच आहेत. (१) सभा विधियुक्त आहे हे पाहणे, योग्य नोटीस, गणसंख्या, नियमानुसार निमंत्रित, घ नियमानुसार संघटित अशी ती असून सभासदांची ती सभा आहे व राहील याबद्दल दक्षता घेणे. (२) नियमाप्रमाणे सभाकार्य व सभासंचालन होईल याबद्दल दक्षता घेणे व सभाकार्य ज्याप्रमाणे कार्यक्रम-पत्रिकेंत (Agenda ) ठरविले असेल त्याप्रमाणे व त्या क्रमाने घेणे. सभेचे संमतीने जर त्यांत बदल झाला तर तेवढाच तो करणे. सभेचे संमतीशिवाय कार्यक्रमपत्रिकेत बदल करू नये. (३) सभेपुढे येणारे विषय नियमानुसार येतील व येणारे ठराव अगर उपसूचना योग्य रीतीने व रीतसर मांडल्या गेल्या आहेत याबद्दल दक्षता घेणे. (४) चर्चेला मांडलेल्या विषयांवर भिन्न मते प्रदार्शत होऊन योग्य वादविवाद (Reasonable Debate ) व्हावा या दृष्टीने वक्त्याला योग्य वेळ देऊन, विषयाला प्रस्तुत व सभ्य भाषण करण्याला संधि मिळेल अशी चर्चेची व्यवस्था करावी. नियमाप्रमाणे विषयमग तो ठरावरूपाने असो अगर अन्यरूपाने असो- रीतसर मांडला गेल्याशिवाय त्यावर चर्चा होऊ देऊ नये, नियमांत ठरावाला अगर उपसूचनेला अनुमोदन अवश्य असेल तर ते मिळाल्याशिवाय विषय रीतसर मांडला गेला असे होत नाहीं, व त्यावर चर्चाही होत नाहीं. (५) होणारी चर्चा विषयाला प्रस्तुत असेल व वक्त्याची भाषा सभ्य व विधाने सत्य असतील याबद्दल दक्षता घेणे. अप्रस्तुत, असंबद्ध चर्चा बंद करणे, सभेपुढे नसलेल्या विषयावर बोलू न देणे, एकापेक्षा अधिक वेळां एका व्यक्तीला बोलू न देणे. (६) वेळोवेळी कायद्याचे व कामकाजी मुद्दे ( Points of Order ) उपस्थित होतील त्यांवर निर्णय देऊन कार्य नियमानुसार चालविणे स्वतःला कांहीं गैरकायदा झालें अगर गैराशस्त झाले असे आढळून आल्यास ते योग्य निर्णय देऊन नियमानुसार करून घेणे. (७) नियमाप्रमाणे चर्चा संपली अगर कोणी बोलणारा नाहीं अगर पुरेशी चर्चा झाली म्हणून सभेने चर्चाबंदीची सूचना पास केली म्हणजे नियमाप्रमाणे सभेचे मत घेणे व ते जाहीर करणे, पोल मागितल्यास नियमाप्रमाणे देऊन त्याचा निकाल जाहीर करणे, (८) नियमाप्रमाणे सभा तहकूब अगर बरखास्त करणे, (९) सभेच्या वृत्तांताची नोंद व्हावी म्हणून जरूर ती व्यवस्था करणे.