पान:सभाशास्त्र.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ܟܐ सभानियमन व संचालन ••••••••••••••••••••••••••••••••••••••••• अध्यक्ष निव्वळ सभानियंत्रक नसतो. सभेच्या नियंत्रणाबरोबर त्याला सभाकार्याचे मार्गदर्शन करावे लागते. संस्थेचा तो अध्यक्ष असल्याने संस्थेचे ध्येय व धोरण राखण्याची जबाबदारी त्याची असते. निव्वळ नियमाप्रमाणे काम चालवून त्याचे कर्तव्य संपत नाहीं. नगरपालिकेचा अध्यक्ष, लोकल बोर्डाचा अध्यक्ष, पंचायतीचा अध्यक्ष, हे नुसते सभानियंत्रक नाहींत; त्यांना मार्गदर्शनही करावे लागते, धोरणे ठरवावी लागतात, व संस्थेच्या निर्णयाची अमलबजावणी करावी लागते. नियमानुसार ठराव चर्चेला आला येवढ्याने त्यांचे कार्य पूर्ण होत नाही. संस्थेच्या धोरणाचे दृष्टीनेही त्यांनी विचार करावयास पाहिजे. म्हणून अध्यक्ष, विषयाचा माहीतगार व सभासंचालनतज्ज्ञ असावा लागतो. चर्चेत त्याला भाग घ्यावा लागतो. चर्चेला इष्ट ते वळण लावून इष्ट तो निर्णय घडवून आणण्याची पण जबाबदारी त्याचेवर असते. सार्वजनिक सभेचा अध्यक्ष तसेच विधिमंडळांतील अध्यक्ष में विशेषेकरून सभानियंत्रक असतात. सभेपुढे काय विषय यावा, कोणते बिल यावे याबद्दलची जबाबदारी त्यांची नसते. येणारा विषय अगर बिल नियमाप्रमाणे असले म्हणजे झालें. ध्येय व धोरणाचे दृष्टीने त्याची इष्टानिष्टता पाहण्याचे कार्य त्यांचें नाहीं. वाक्यांत काय अर्थ अगर कल्पना आहेत याचा विचार व्याकरण करीत नाही. केवळ शुद्धाशुद्धतेचा विचार ते करते. सभानियंत्रकाची भूमिका ही व्याकरणाचे भूमिकेसारखी आहे. समाविषयक नियमांना अनुसरून कामकाज चाललें येवढेच सभानियंत्रक पाहणार. संस्थांच्या सभांचे स्वरूप लक्षांत घेतां सभेचा अध्यक्ष विषयांचा माहीतगार व उत्कृष्ट सभासंचालक असावा. शांत, शांतपणे ऐकण्याची सवय असलेला, हजरजबाबी, विवेकी, न्यायबुद्ध असून खेळीमेळीनें काम करणारा, नम्र पण निश्चयी, सभा म्हणजे नानावृत्तींची माणसे हे जाणून त्यांना गोडीगोडीने वागवून घेणारा, क्षुद्र टीका अगर क्षुद्र बुद्धीने केलेल्या टीकेला उपेक्षिणारा, आपल्या भाषणाने विधायक वातावरण निर्माण करणारा, प्रासंगिक विनोदाने प्रक्षोभित वातावरणांत प्रसन्नता उत्पन्न करणारा, अल्पसंख्याकांना योग्य संरक्षण देणारा, शिस्त व नियम यांना धरून होणाच्या विरोधाला योग्य वाव देणारा, सभामोडे व गुंड यांना शिस्त लावणारा, सभेतील चच उच्च व उन्नत वातावरणांत होईल याची दक्षता घेणारा अध्यक्ष, सभापति, सभानेता व सभानायक अशी त्रिविध भूमिका शोभवितो. अध्यक्षाच कर्तव्येः—सभेचा अध्यक्ष या नात्याने अध्यक्षाचीं कांहीं