पान:सभाशास्त्र.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ सभाशास्त्र । सभासदांवर कांहीं अधिकार गाजवतो या दृष्टीने त्याची निवडणूक प्रत्यक्ष संमतीने म्हणजे मते घेऊन व्हावी हे इष्ट व तात्त्विक दृष्ट्याही निर्दोष आहे. । अध्यक्ष कसा असावाः-सभेचा अध्यक्ष कसा असावा याच्यासंबंधी कांहीं दिग्दर्शन मागील प्रकरणांत केले आहे. सार्वजनिक सभेच्या अध्यक्षापेक्षा कांहीं अन्य गुण संस्थेच्या कायम अध्यक्षाचे व संस्थेच्या सभेच्या अध्यक्षाचे अंगांत असणे इष्ट आहे. सार्वजनिक सभेत शांतता व सुव्यवस्था राखणारे गुणविशेष अध्यक्षाचे ठिकाणीं अधिक महत्त्वाचे ठरतात. येथे जे कामकाज होणार असेल त्याचे सम्यक् व संपूर्ण, निदान जास्तीत जास्त, ज्ञान असणे इष्ट असते. धीरप्रवृत्ति, दृढमति, खेळीमेळीने काम करणारा, पण त्याचबरोबर कार्याचा उरक असणारा, जुळवून घेणारा, पद्धतींत व शिस्तीत काम करणारा तो असला पाहिजेच. तसेच ज्या विषयाची चर्चा व्हावयाची असेल त्याबद्दलची माहिती विशेष प्रमाणांत त्याला असणे इष्ट आहे. शीघ्रकोपी, चिडका, बाजू घेऊन काम चालविणारा अध्यक्ष सर्वस्वी अयोग्य होय. * ज्याला पद्धतशीर काम करण्याची संवय नाहीं, जो कांहीं वेळसुद्धा निःपक्षपाती व न्यायी राहू शकत नाहीं, ज्याची बुद्धि तर्कविन्मुख आहे, ज्याला विचार करता येत नाही व झटपट निकाल करण्याची ज्याची ताकद नाहीं, ज्याला कामकाज चालावण्याचे ज्ञान नाहीं, ज्याला आपले म्हणणे योग्य रीतीने मांडता येत नाही, त्यान आपण होऊन अध्यक्षपद केव्हांही घेऊ नये. आणि तसा प्रसंग आलाच तर त्यांतून निसटून जाण्यासाठी मागील दाराची आगाऊ योजना करून ठेवावी, ती उपयोगी पडते.” ( A man without any method of habit who cannot, at least on occasion be judicial and unbiased whose mental make-up lacks logic; who cannot think and decide quickly and who cannot express himself well should not voluntarily take the Chair on any occasion, or if he does should see that there is a back exit handy: it may be useful.' (Chairman's Manual, Gowdeo Pott70) । सार्वजनिक सभा तास दोन तास चालते. संस्थेच्या सभा दैनंदिन अरू शकतात, जाहीर अधिवेशनें, विषयनियामक समित्यांच्या बैठका, यांचे सभाविषयक स्वरूप निराळे असते, तासन्तास अध्यक्षाला बसावे लागते. अधीर प्रकृति, अज्ञानी, अविवेकी अध्यक्ष सभाकायचा नाश करतो, संस्थेच्या सभेच