पान:सभाशास्त्र.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८३ सभानियमन व संचालन अन्यायाला जागा राहत नाही. ज्या सभेत अध्यक्षाच्या वर्तनाबाबत निंदास्पद अगर टीकात्मक विषय उपस्थित होणार असेल, अगर झाला असेल, व अध्यक्षास विस्तारशः त्याबाबत बोलणे असेल, अगर चर्चा करणे असेल, तर तत्प्रसंगी अध्यक्षाने तात्पुरतें सभेचे अध्यक्षपद सोडून दुसन्यास देण्याविषयी सभेस विनंति करावी. अध्यक्षपदावर राहून वादविवादात्मक व वैयक्तिक बाबतींत मोकळेपणे अध्यक्षास बोलतां येत नाही. शिवाय त्याच्या भाषणाला इतरांना उत्तर देतां येत नाहीं. उभयपक्षी न्याय मिळावा या दृष्टीने सभेने तात्परता सभापति नेमून अध्यक्षास त्याचेविरुद्ध उपस्थित झालेल्या आक्षेपांना अगर टीकेला उत्तर देण्यास संपूर्ण मोकळीक द्यावी; न्याय्य आणि रास्त चर्चा घडवून आणावी, निदान तशी संधि उपलब्ध करून द्यावी. अध्यक्षाची सूचनाः–जेथे अधिकारी अध्यक्ष हजर आहे तेथे अध्यक्षाची सूचना करण्याचे कारण नाहीं. नियमाप्रमाणे तो अध्यक्ष सिद्ध असतो. जेथे निवडणूक करावयाची असेल तेथे उपस्थित सभासदांपैकी कोणीही कोणाचे नांव सुचवावें. “श्रीयुत-- यांनी आजच्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावें, या सूचनेला अनुमोदन असावे असा प्रघात आहे. तथापि अनुमोदन असावें असा संस्थेचा नियम नसेल तर अनुमोदन नाही म्हणून ती सूचना गैर ठरत नाहीं. कायद्याने अनुमोदनाची आवश्यकता नसेल तर त्याच्या अभावी पण ही सूचना गैर ठरत नाहीं. ही सूचना मांडणाराने व अनुमोदन देणाराने भाषण करतांना काय मर्यादा पाळाव्यात याचा उल्लेख मागील प्रकरणांत केला आहे. दुसरे नांव सभेपुढे न आल्यास आलेले नांव मतास घालून सदरहू इसम निवडून आला असे सूचना करणाराने जाहीर करावे. दुसरे नांव रीतसर पुढे आलें तर मतमोजणीने निकाल करावा. ही मतमोजणी सूचना आणणारानें अगर संस्थेच्या चिटणिसाने अगर अन्य अधिका-याने करावी. निकाल सूचना आणणाच्याने जाहीर करावा. पहिले नांव रीतसर सुचविल्यानंतर दुसच्या नावासाठी वाटेल तितका वेळ सभेला ताटकळत ठेवणे इष्ट नाही. केव्हाही दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाट पाहण्याचे कारण नाहीं, तेवड्या वेळांत दुसरें नांव न आल्यास सूचना करणाराने आपली सूचना मतास घालावी व निकाल जाहीर करावा, दुसरे नांव आले नाही म्हणून एकदम बिनविरोध निवडणूक झाली असे जाहीर करणे गैरकायदा नसले तरी, इष्ट नाही. अध्यक्ष म्हणजे सभानियंत्रक असतो,