पान:सभाशास्त्र.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ८२

ތރގއވރވމފހރތކށވއތރގ संस्थेच्या अध्यक्षानेच घ्यावे असे असेल तेथे तो सभेत हजर असतांना इतराला अध्यक्ष करता येणार नाही. हा अधिकारी अध्यक्ष सभेचा अध्यक्ष होण्यास कबूल नसेल अगर मध्येच सभा सोडून तो गेला असेल तर उपस्थित सभासदांना दुसरा अध्यक्ष निवडण्याचा हक्क आहे. सभेने दुसरा अध्यक्ष निवडला व नंतर अधिकारी अध्यक्ष हजर झाला तर पेचप्रसंग निर्माण होतो. निवडलेल्या अध्यक्षाने जागा खाली करण्याचें नाकारलें व आधकारी अध्यक्षाने पदसिद्ध हक्क गाजविण्याचे म्हणजे सभेचे अध्यक्षपद घेण्याचे ठरविले तर सभासदांपुढे नाजुक प्रश्न उपस्थित होतो. जेथे अधिकारी अध्यक्ष येईपर्यंतच म्हणजे अध्यक्षाचे सूचनेतच स्पष्ट उल्लेख करून अध्यक्ष सभेने निवडला असेल तेथे अर्थात् प्रश्नच उपस्थित होत नाही. ज्या संस्था कायद्याने अस्तित्वांत आल्या आहेत, म्हणजे विधिसिद्ध (Statutory Bodies) त्यांच्या सभेत वरील परिस्थितींत तात्पुरत्या निवडलेल्या अध्यक्षाने अध्यक्षपद सोडले पाहिजे. सभेला अधिकारी अध्यक्ष हजर झाला असता त्याला बाजूला सारून कायदेशीर काम करता येत नाही. विधिसिद्ध अगर कायद्याने अस्तित्वात आलेल्या संस्था म्हणजे लोकल बोर्डे, नगरपालिका, विधिमंडळे वगैरे. ज्या संस्था कायद्याने अस्तित्वात आल्या नाहीत, ज्या इच्छासिद्ध आहेत मग त्या नोंदलेल्या (Registered) असोत अगर नसोत त्यांच्या बाबतींत वरील परिस्थितीत सभेने अधिकारी अध्यक्षाला बाजूला ठेवून निवडलेल्या अध्यक्षाचे नियंत्रणाखालीं सभाकार्य केले तर, ते गैरकायदा होत नाहीं. सभेने तात्पुरता अध्यक्ष निवडलेला असतो; व तसा सभेला हक्क आहे. म्हणून अधिकारी अध्यक्ष उपस्थित झाल्यानंतर सभेने निवडलेल्या अध्यक्षास विनंति केली असता त्याने ती मानून अध्यक्षपद सोडावे यांत सर्वांची सोय व प्रतिष्ठा असते. सभेला, निवडलेल्या अध्यक्षास, अधिकारी अध्यक्ष उपस्थित झाला म्हणून अध्यक्षपद सोडावे असा ठराव करण्याचा पूर्ण हक्क आहे. पेचप्रसंग विनंतीने सुटणे योग्य आहे. ठरावापर्यंत अधिकार गाजविण्याचा प्रसंग आणणे अगर येऊ देणे इष्ट नसते. संस्थेच्या अध्यक्षाची निवडणूक ज्या सभेत होते त्या सभेचा सभापति उमेदवाराने होऊ नये. विद्यमान अध्यक्ष जर पुन्हा निवडणुकीसाठी उमेदवार असेल तर, त्याने सदरहू सभेचे सभापति होऊ नये. जागा खाली करून सभेला त्या सभेपुरता सभापति निवडण्यास सांगावे. असे केल्याने निवडणुकीत