पान:सभाशास्त्र.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९ सभानियमन व संचालन टक्के असे चालणार नाही, अशीही व्यवस्था असू शकते. तथापि सभेचा निर्णय हा बहुमताचाच निर्णय असतो. अल्पमताचा निर्णय असू शकत नाहीं. विचारविनिमयाने, चर्चेने कार्य व्हावयाचे म्हणजे एकमत न झाल्यास ते बहुमतानेच झाले पाहिजे. निर्णय हे बहुमतानेच घेतले जातात. एकाने सांगावे व सर्वांनी ऐकावें ही हुकूमशाही पद्धत सभाकार्याच्या तत्त्वज्ञानाशी विसंगत आहे. सभा म्हणजे सर्वांनी जमावें, विचार करावा व शेवट बहुमताने जे ठरेल तो सभेचा निर्णय सामुदायिक निर्णय म्हणून ग्रहण करावा, एकमेकांना विचाराने वळवावे, मुद्दे सांगून मनें आपल्या बाजूची करावी, ही सभेची पार्श्वभूमि आहे. म्हणून बहुमतावर सभाकायची उभारणी आहे. यामुळे सभानिर्णयांत कांहीं गैरकायदा असल्याशिवाय न्यायालये त्यांत हस्तक्षेप करीत नाहींत. सभाः—नियमानुसार निश्चित विषयाचा विचार करण्यासाठी एकत्र आलेले. सभासद म्हणजे सभा होय. | विधियुक्त सभा ( Valid Meeting ):- खालील गोष्टी असल्याशिवाय संस्थेची कोणतीही सभा विधियुक्त होणार नाहीं. | (१) योग्य रीतीने ती निमंत्रित झाली पाहिजे. म्हणजे हजर राहण्याचा हक्क असणारांस योग्य सूचना मिळाली पाहिजे. (२) योग्य रीतीने ती संघटित झाली पाहिजे; म्हणजे जींत योग्य रीतीने निवडलेला अगर नेमलेला सभापति नियंत्रण करीत आहे. (३) गणसंख्या नियमाप्रमाणे हजर असली पाहिजे. (४) ती संस्थेचे नियमाप्रमाणे भरली,पाहिजे. म्हणजे नोटीस, स्थळ, काळ, विषय वगैरेबाबत जे नियम असतील त्याला अनुनरून ती असली पाहिजे, तसेच बहुसंख्याक सभासदांच्या सोयीच्या दृष्टीनेही ती इष्ट वेळी, इष्ट जाग असावी, नाहीं तर हक्क असून हजर राहणे अशक्य केले जाते असे होऊ नये. तसे झाले तर, ती सभा विधियुक्त होणार नाहीं. सभेची सूचना ( नोटीस ):--सभेची सूचना हजर असण्याचा हक्क असणाच्या प्रत्येक सभासदाला योग्य वेळी मिळाली पाहिजे. योग्य रीतीने ती धाडली असली अगर नियमाप्रमाणे प्रासद्ध झाली असेल तर ती प्रत्येकाला मिळाली असे मानले पाहिजे. सभासदाचा नेहमीचा पत्ता लिहून ती पोस्टांत