पान:सभाशास्त्र.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ७८ लेला असतो. त्या सर्वांच्या निर्णयांत एकवाक्यता करणे, त्यांचा समन्वय करणे, त्यांच्यांत कमीजास्त करून सूत्रबद्धता आणणे, हे काम करणारी संयोजन-समिति होय. तज्ज्ञसमिति ( Committee of Experts ):- प्रश्नाचे संबंधी जे तज्ज्ञ असतील, विशेष माहीतगार असतील त्यांची समिति म्हणजे तज्ज्ञसमिति, कर्णधारसमिति ( Stefring Committee ):-- अनेक अडचणी उपस्थित होतात त्या लक्षात घेऊन, दक्षतेने ठरवलेले कार्य पार पाडणारी कार्यदर्शी माणसांची समिति म्हणजे कर्णधार-सामति. उपसमिति ( Sub-committee ):- समितीने नेमलेली जी समिति तिला उपसमिति म्हणतात. सामति संपतांच उपसमित्या संपतात, जेवढे दिले असतील तेवढेच अधिकार तिला असतात. संस्थेने सभाद्वारा जें काम करावयाचे असते त्याबाबत नियम असणे इष्ट आहे. संस्थेचे नियमांत महामंडळाचे सभेत कसे कार्य व्हावे यासंबंधी सामान्यतः नियम असतात. पण अनेक वेळा निरनिराळी कामें निरनिराळ्या सामत्यांकडे सोपविली जातात. तेथे कोणत्या पद्धतीने काम व्हावे याचा उल्लेख नसतो. म्हणून सामत्यांतून कसे काम चालते याचाही विचार या प्रकरणांत केला आहे. स्थूल मानाने समित्यांचे प्रकार वर सांगितलेच आहेत. त्यांचे स्वरूप, कार्य व कालमर्यादा कशा जरी असल्या तरी, त्यांच्यात होणारे विचारविनिमयाचे कार्य, चर्चचे नियमन नियमबद्ध असणे जरूर आहे. सर्वसाधारणपणे सभेचे नियम व संचालनाचे नियम तारतम्याने समितीच्या सभांना लागू केले जातात. बहुमतमहत्त्वः–समिति असो, महामंडळ असो अगर विराट् स्वरूपी सार्वजनिक सभा असो सभेचे मत म्हणजे सभेतील बहुसंख्याकांचे मत, हा सिद्धांत मौलिक आहे. विशिष्ट विषयाच्या अगर प्रश्नाच्या निर्णयासाठी निव्वळ बहुमत पुरेसे न मानता, विशिष्ट प्रमाणांत बहुमत निर्णयात्मक असावे असेही काही संस्थांच्या घटनांमध्ये असते, घटनात्मक बदल करावयाचा असेल तर तीनचतुर्थांश बहुमत असले पाहिजे, अगर भांडवल वाढवावयाचे असेल तर विशिष्ट प्रमाणांत बहुमत पाहिजे. निव्वळ बहुमत म्हणजे ५१ टक्के विरुद्ध ४९