पान:सभाशास्त्र.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सक्षाशास्त्र ८० مي عمر میں میں میں میں میری میں مر ع ع ع ع ع ع م ع عم هم امس مور هم می می می می می टाकली असेल तर ती त्याला मिळाली असे कायदा मानतो. सभासदाच्या नेहमच्या पत्त्यावर अन्य रीतीनें वांटणाच्याने टाकली असेल तर, ती मिळाली असे मानले जाते. योग्य रीतीने ती धाडली असली म्हणजे ती मिळाली असं समजण्यांत येते. नियमांत अमुक वर्तमानपत्रांत अगर मोघम वर्तमानपत्रांत सूचना जाहीर करावी असे असेल तर, व त्याप्रमाणे प्रसिद्ध झाली असेल तर ती प्रत्येकास मिळाली असे मानले पाहिजे. नियमांत अमुक दिवसांची नोटीस द्यावी असे असेल तर ज्या तारखेची नोटीस असेल ती तारीख सोडून, व ज्या दिवशी सभा असेल तो दिवस सोडून, दिवस मोजावेत. सात दिवसांची आगाऊ सूचना अगर नोटीस असावी असा नियम असेल तर दोन्ही दिवस सोडून सात दिवसांचे अंतर त्यांत असले पाहिजे, जर दहा तारखेस सभा असेल तर तो दिवस सोडला पाहिजे, म्हणजे नोटीस ता. दोन अगर त्यापूर्वीची असली पाहिजे हे उघड होते, ता. ३ तीनची नोटीस असेल तर तो दिवस सोडून पुरे ७ दिवस होत नाहीत म्हणून सभा अपु-या नोटिशीमुळे बेकायदेशीर होते. किती दिवसांची आगाऊ नोटीस असावी, हे नियम तयार करतांना सभेचा व्याप व हेतु लक्षात घेऊन ठरविणे इष्ट असते. सभासद देशभर अगर प्रांतभर पसरले असतील तर जास्त दिवसांची आगाऊ नोटीस असावा. गांवांतीलच इसम सभासद असतील तर कमी दिवसांची नोटीस ठेवणे गैर नाहीं. नियमाप्रमाणे ज्याला सूचना देण्याचा अधिकार असेल त्याने ती काढली पाहिजे. अन्यथा ती रीतसर होणार नाही. चिटणिसाने नोटीस काढावी असा नियम असतां एखाद्या कारकुनाने ती काढली तर ती रीतसर होणार नाहीं. अधिकृत मनुष्याच्या गैरहजेरीत ती कोणी काढावी यासंबंधी नियमं बहुशः असतात. नियम नसेल व अधिकृत इसम गैरहजर असेल तर संस्थेच्या अध्यक्षास तो अधिकार आहे' असे मानले जाते; व त्यानें अगर त्याचे हुकुमावरून काढलेली नोटीस रीतसर मानण्यांत येते, | सभेच्या नोटिशीत, सभेची तारीख, वेळ, जागा व विषय यांचा स्पष्ट उल्लेख असावा. सभेपुढे येणाच्या विषयांचा उल्लेख, कामकाजाचे स्वरूप, सामान्य माणसाला सहज कळेल इतका सुलभ व स्पष्ट असावा. खास सभा असेल तर त्यांतील विषय अधिक खुलासेवार रीतीने नोटिशींत उल्लेखिला पाहिजे. नियमांत नोटिशीबरोबर कार्यक्रम-पलिकाही धाडावी असे असेल तर तीही