पान:सभाशास्त्र.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७७ सभानियमन व संचालन कार्य करण्यासाठी थोड्या सभासदांचे एक कार्यकारी मंडळ महामंडळाचे सभेत ठराविक कालासाठी निवडले जाते, अगर घटनेत नियम असेल तर त्या नियमानुसार अधिकारी इसमांकडून नेमले जाते. दैनंदिन कार्य करण्यासाठी महामंडळाचे धोरण व निर्णय अमलात आणण्यासाठी थोड्या व निवडक माणसांची निवडणूक अगर नेमणूक झाल्याशिवाय संस्थेचे कार्य व्यवस्थित होत नाही, कार्यकारी मंडळाला कोठे व्यवस्थापक मंडळ, व्यवस्थापक कमिटी अगर समिति, संचालक मंडळ, देखरेख मंडळ अगर विश्वस्त मंडळही म्हणण्यांत येते. या कार्यकारी मंडळाकडे संस्थेच्या घटनेप्रमाणे कामें सोंपविलेली असून या मंडळाचे अधिकार महामंडळाचे अधिकारापेक्षा कमी व मर्यादित असतात, समिति ( Committee ):–संस्था अगर सार्वजनिक सभा विशिष्ट अगर सर्वसाधारण कामाकरतां एक अगर अधिक इसम नेमून अगर निवडून त्यांचेवर ते काम सोपविते. अशा नेमलेल्या अगर निवडलेल्या इसमांची मिळून समिति होते. सामतीचे अधिकार जे व जेवढे दिले असतील तेवढेच असतात. सामान्यतः मामतीचे निर्णय शिफारसवजा असतात. त्यांना सामिति नेमणाच्या संघटनेच्या मान्यतेची जरूरी असते. विशिष्ट समिति ( Select Committee ):-निवडक कार्याकरतांच नेमलेली अगर निवडलेली समिति म्हणजे विशिष्ट समिति व ते काम संपतांच ती संपते. खास समिति ( Special Committee ):- खास कामासाठी नेमलेली अगर निवडलेली व ते काम चालू असेपर्यंत विद्यमान असणारी समिति म्हणजे खास समिति, स्थायी समिति (Standing Committee ):–एखादा विषय अगर एखादा प्रश्न जेव्हां उत्पन्न होईल तेव्हां तेव्हा त्याचा विचार करण्यासाठी, त्याबाबत जरूर त्या शिफारसी करण्यासाठी, अगर नियमाप्रमाणे अन्य रीतीने त्याचा निकाल लावण्यासाठी जी समिति असते तिला स्थायी समिति म्हणतात. तिची मुदत तिला अस्तित्वात आणणारी संस्था अगर संघटना ठरविते. संयोजक समिति ( Co-ordinating Committee ):-- एखाद्या विषयाची अनेक अंगे असतात. त्यांचा विचार अनेक समित्यांकडे सोपविः