पान:सभाशास्त्र.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. सभाशास्त्र ७६ . जरी असले तरी ते विचारविनिमय होऊन, ठराव होऊन, धोरणे ठरून होत असते आणि विचार-विनिमय अगर चर्चा यांचे माध्यम म्हणजे सभा. म्हणून प्रत्येक संस्थेचे संभाविषयक नियम असतात. सभा-संचालन कसे करावें। याचेही नियम असतात. कांहीं संस्था कायद्याप्रमाणे नोंदलेल्या असतात. कांहीं नोंदल्याशिवाय काम करू शकत नाहीत. काही संस्था कायद्याने अस्तित्वात आलेल्या असतात. तथापि संस्था कशीही असो तिचे काम नियमबद्ध असले पाहिजे. तिच्या व्यवहारांत निश्चिति पाहिजे. सर्वसामान्यपणे सभानियम व सभासंचालन यांचा विचार या प्रकरणांत करणे आहे. यांतील तवें ज्या संस्थांच्या घटनेत जरूर ते नियम नाहींत, अपुरे आहेत, अगर अस्पष्ट आहेत तेथे लागू करणे योग्य ठरेल. तसेच सार्वजनिक सभातंत्राचा विचार करतांना जे विवरिलें आहे ते तारतम्याने सर्व सभांना लागू आहे; तसेच जें येथे सांगितले आहे तेही तारतम्याने सार्वजनिक सभेलाही लागू करण्यास हरकत नाहीं. सभासदः–संस्थेचे सभासद तिचे घटनेप्रमाणे होता येते. सभासद कोणाला होता येते हे प्रत्येक संस्थेच्या घटनेत सांगितलेले असते. वर्गणी भरून, निवडून येऊन, भाग खरेदी करून, विशिष्ट दर्जा प्राप्त करून, विशिष्ट ध्येय मान्य करून अगर जी कांहीं लायकी अगर पात्रता सभासदत्वासाठी ठरविली असेल ती पूर्ण करून मनुष्य सभासद होतो. घटनेप्रमाणे सभासद झालेल्या सर्वांची मिळून ती संस्था असते. महामंडळ (Generel Body ):–संस्थेच्या सर्व सभासदांचे जे संघटन त्याला सर्व अधिकार असतात. ते संस्थेच्या कार्याबाबत सर्वसत्ताधीश असते. सर्व सभासद मिळून होणारे संघटन म्हणजे संस्थेचे महामंडळ ( General Body ) होय, या महामंडळाचे सभेत संस्थेच्या सर्व कार्याबाबत अखेरचे निकाल घेतले जातात, सर्वसामान्य धोरणे ठरविली जातात. संस्थेला मौलिक असलेल्या गोष्टींत फेरफार करण्याचा अधिकार या मंडळाला असतो. महामंडळाचे सभेत हजर राहून भाग घेण्याचा अधिकार प्रत्येक सभासदाला असतो, कार्यकारी मंडळ (Managing Committee ):-- महामंडळाचे अगर मुख्य व मूळ सभेचे सभासद हजारोंनी असू शकतात. तथापि ते कांहीं वारंवार एकत्र येऊन संस्थेचे दैनंदिन कार्य पाहू शकत नाहींत. संस्थेचे दैनंदिन