पान:सभाशास्त्र.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५ सभानियमन व संचालन राज्यव्यवस्थेला अवश्य आहे. लोकांनी आपली मनोगते बोलून दाखवा यासाठीं भाषणस्वातंत्र्य, सभास्वातंत्र्य व लोकांना आपली उन्नति जशी व्यक्तिशः करण्याचा हक्क आहे तशी चार माणसे मिळून संघशक्तीने करण्याचा हक्क आहे, व त्यासाठी संघस्वातंत्र्य ही दोन्हीं स्वातंत्र्यें अवश्य आहेत. त्याशिवाय नागरिकत्व यथार्थ नाहीं. संघस्वातंत्र्य म्हणजे एकापेक्षा अधिक माणसांनी एकत्र येऊन कायम स्वरूपाचे संघटन तयार करून त्या संघटनेमार्फत दैनंदिन काम करणे होय. या संघटनेत येणारे, सभेतील व्यक्तीसारखे तात्पुरत्या कामासाठी येत नसून ते त्यांत कायम असतात, त्यांच्यांतील हितैक्य क्षणिक नसून अधिक काल टिकणारे असते. वर उल्लेखिलेला संघस्वातंत्र्याचा हक्क घटनेने मान्य केलेला असो, अगर संकेताने मान्य करून त्याच्या मर्यादा विद्यमान् कायद्याने सांगितलेल्या असोत, तो आजच्या जगात एक प्रभावी हक्क झाला आहे. मनुष्यें संगतप्रिय आहेत. चार माणसांनी जमून राहावे अशी त्यांची नैसर्गिक प्रवृत्ति असते. मनुष्य इतर मनुष्याबरोबर प्रवृत्तींच्या दृष्टीने साधर्म्य पाहत असतो, सारख्या आवडीची, सारख्या कलावृत्तीची, सारख्या ध्येयाची माणसे साहजिक एकल येऊ इच्छितात. या एकत्र येण्यांत, संघांत येण्यांत, व्यक्ति आपले व्यक्तिमत्वाला अधिक क्षेत्र मिळवीत असते. आपले व्यक्तित्वाचा विकास ती करूं इच्छिते, व्यक्तीच्या विधायक शक्तीच्या विकासाला संघ में एक उत्कृष्ट क्षेत्र असते. संघशक्तीच्या जोरावर, जे एका एकाला करता येणार नाहीं, ते सहकार्याने संघामार्फत करणे शक्य असते. व्यक्तीने एखादे बाबतींत धोरण जाहीर करणे व एखाद्या जुन्या व प्रतिष्ठित संस्थेने ते जाहीर करणे यांतील फरक उघड आहे. आजच्या जगांत संघप्रवृत्ति ही समाजजीवनांतील एक मुख्य व मौलिक बाब झाली आहे. बालक-संघापासून सेवानिवृत्तांचे संघापर्यंत जीवनतील सर्व टप्प्यांत ही प्रवृत्त दिसून येते. बेकारसंघापासून गिरणी-मालकांचे संघापर्यंत ही प्रवृत्ति कार्य करते. मजूर-संघ, मालक-संघ, विद्यार्थि-संघ, शिक्षकसंघ, प्रागतिक पक्ष, सनातनी पक्ष, क्रांतिकारक पक्ष, व्यापारी-संघ, गि-हाईक. संघ, क्रीडा-संघ, अध्यात्ममंडळ वगैरे. तात्पर्य, समाजांतील जीवनांतील सर्व क्षेत्रांत ही प्रवृत्ति काम करीत आहे असे दिसून येईल. संघ अगर संस्था, पक्ष अगर मंडळ हे क्षणिक संघटन नव्हे, म्हणून त्याला घटना असते; नियम असतात आणि त्याप्रमाणे कार्य चालवावयाचे असते, कार्याचे स्वरूप कांहीं