पान:सभाशास्त्र.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्र ७४ އއވގތކމގއވރވގ अगर बंद करण्याचा अधिकार नाहीं. सभाकार्य संपलें म्हणजे सभा संपते; अगर सभेने संमतीने सभा आगाऊ संपविली तर संपते. सभा सुरू झाल्यानंतर दंगल झाली, शांततेने काम करणे अशक्य झाले, तर अध्यक्षांना अगर पोलिसांना सभा बंद करण्याचा अधिकार आहे. सभा सुरू होण्यापूर्वीच जर दंगल सुरू झाली, अगर अफाट गर्दी लोटून 'अगर अन्य कारणाने सभा सुरू होणे अशक्य झाले, तर मात्र समाचालकांना सभा रद्द करण्याचा हक्क आहे. सभाचालकांना या परिस्थितीत सभा अमुक जागी व अमुक वेळी होईल असे जाहीर करण्याचा अधिकार आहे; मात्र सभा तहकूब केली असे म्हणता येणार नाही. सुरू झालेली सभा मात्र तहकूब करता येते. तारीख व स्थळ देऊन सभा त्याच वेळी जाहीर केली तर पुन्हा जाहीर निमंत्रणाची जरूरी नाहीं. सभा रद्द केली एवढेच जर जाहीर केले तर मात्र पुन्हा जाहीर आमंत्रणाची जरूरी आहे. सभानियमन व संचालन --- - सार्वजनिक सभेचे महत्त्व आजकाल विशेष असल्याने तिजबद्दलचा विचार " यथाप्रमाण मागील प्रकरणांत केला आहे. अनेक त-हेच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडाविषयक वगैरे संस्था समाजांत असतात, व जेथे संघस्वातंत्र्य आहे तेथे त्यांची संख्या व विस्तारही मोठा असतो. भाषणस्वातंत्र्याचे हक्काचे स्वरूप म्हणजे सभास्वातंत्र्य होय; एके ठिकाणी जमणे, व वक्त्याचे भाषण ऐकणे, चर्चा करणे, या सर्वांचा त्यात समावेश होतो. निव्वळ सभेकरितां येणे म्हणजे येणान्यांत कांहीं हितैक्य आहे, निदान वक्त्याचे भाषण ऐकण्याची तरी सर्वांची इच्छा आहे. तथापि हे हितैक्य कालाचे दृष्टीने सभाकालाइतकेच मर्यादित आहे. सभेला हजर राहिले, सभा संपली, चार माणसे चार दिशेला गेली असे होते. एकत्र जमून वक्तृत्व ऐकणे हा जसा हक्क आहे तसाच एकत्र येऊन कांहीं कार्य करणे, हाही एक मौलिक हक्क आहे. एकत्र येऊन काम करणे व त्यासाठी संघ काढण्याचे स्वातंत्र्य असणे हे लोकशाही