पान:सभाशास्त्र.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९७३ सार्वजनिक सभातंत्र wwwwwwwwwwww wwwww. अध्यक्ष यांचेवर आहे. सभासंचालन करीत असतां अध्यक्ष जे सांगतील तें सभासदांनी ऐकले पाहिजे, तसेच अध्यक्ष जे सांगतील त्याप्रमाणे सभाचालकांनी ऐकले पाहिजे व तशी व्यवस्था ठेवली पाहिजे. त्यांनी आज्ञा करतांच गैरशिस्त वागणाच्या व अडथळा करणाच्या इसमांस बाहेर काढले पाहिजे; व सदरहू इसमांनी तिकीट विकत घेऊन प्रवेश मिळवला असला तरीसुद्धा त्यांना बाहेर काढण्याचा हक्क सभेच्या अध्यक्षाला आहे. या कामीं जरूरीपेक्षा जास्त शक्तीचा उपयोग केला नसेल तर, अध्यक्षावर अगर सभाचालकांवर काहीही कायदेशीर जबाबदारी नाहीं. तिकीट विकत घेतले म्हणून असभ्य अगर अडथळा आणणारे वर्तन करण्याचा हक्क प्राप्त होत नाहीं. | (१२) सभेत दंगाधोपा झाला अगर होणे अटळ झाले तर, सभाचालकांनी पोलिसांशी शांततास्थापन करण्यासाठीं अगर सभास्थान खाली करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. सभेत शांतता व व्यवस्था ठेवणे हे सभाचालकांचे काम आहे, पण शांतताभंग झाला, दंगल झाली, दंगा होऊ लागला अगर होऊ घातला तर पोलिसांचा हस्तक्षेप योग्य आहे व त्या काम सभाचालकांनी योग्य ते सहकार्य करण्यांत चूक नाहीं. ओते, वक्ते या सर्वांना संरक्षण मिळालें पाहिजे, त्याची जबाबदारी ते जोपर्यंत सभास्थानांत आहेत तोपर्यंत सभाचालकांवर आहे. सभाप्रारंभापासून समाविसर्जनापर्यंत ह्या जबाबदारीची कालमर्यादा आहे. | (१३ ) सभाचालकांनी केलेल्या कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे काम चालावे, त्यांनी योजिलेला अध्यक्ष सभेने मानावा, त्यांनी तयार केलेले ठराव प्रथम मांडले जावेत, त्यांनी योजलेल्या वक्त्यांना प्रथम संधि मिळावी, असे म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे. सर्वसाधारणपणे याप्रमाणे होतेही. तथापि सार्वजनिक सभा ही कोणीं अध्यक्ष व्हावे, काय ठराव पास करावेत, कसे काम चालावें, किती वेळ काम चालावे, या बाबतींत पूर्ण मुखत्यार आहे. कांहीं संकेत व कांहीं मर्यादा या प्रभुत्वाला आहेत व त्यांचा ऊहापोह योग्य स्थानीं केला आहे. | (१४) सभेची व्यवस्था ठेवण्याचा, प्रवेश फी ठेवण्याचा हक्क सभाचालकांचा आहे. सभाचालकांना सभा तहकूब करण्याचा अगर बंद करण्याचा हक्क नाहीं. सभा सुरू झाल्यानंतर नको असलेला अध्यक्ष जरी निवडला गेला, अगर अप्रिय ठराव पास झाले तरीसुद्धा त्यांना अगर कोणालाही सभा तहकूब