पान:सभाशास्त्र.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ७२

आगाऊ घेऊन ठेवावी. दिवाबत्ती व दूरध्वानक्षेपक यांची व्यवस्था वेळीच केलेली असावी. अंधार पडल्यावर बत्त्या येणे, अगर सभा चालू असतां खांब पुरणे, अगर सभेची वेळ झाली तरी लाऊडस्पीकर बसविण्याचे काम चालूच असणे, हे सभा चालकांना भूषणावह नाहीं, (६) अध्यक्षाबाबत पूर्वयोजना असावी. त्यांना वेळी हजर ठेवण्याची व्यवस्था असावी. कार्यक्रमपत्रिका, ठरावाचे मसुदे, वक्त्यांची योजना तयार असावी; व नियोजित वक्ते हजर राहतील अशी व्यवस्था ठेवून त्यांना सभामंचावर अगर जवळ बसवावे. (७) अध्यक्षाचे मेजावर कागद, शाई अगर पेन्सिल, घंटा, घड्याळ, कार्यक्रमपत्रिका, ठरावांचे मसुदे ठेवून एक तरी स्वयंसेवक कायम त्यांचेजवळ असावा. (८) सभेत व्यवस्था ठेवण्यासाठी भरपूर संख्येने स्वयंसेवक तयार ठेवावेत, त्यांना कामाची रूपरेषा सभेपूर्वी देऊन, कांहीं स्वयंसेवक खास राखीव म्हणून ठेवावेत व असाधारण अगर अकल्पित प्रसंग उत्पन्न झाल्यास शांततासंरक्षणासाठी तसेच गैरशिस्त व अडथळा उत्पन्न करणा-या इसमांना अध्यक्ष अनुज्ञा करतांच उचलून बाहेर काढण्यासाठी त्यांचा उपयोग करावा. (९) सभेचा विषय, वक्ते व गांवांतील वातावरण लक्षात घेऊन सभेला विरोध होईल, अगर सभेत गडबड होईल याची जाणीव सभाचालकांना सहज येण्यासारखी असते. कोणता गट विरोध करील, गांवचे गुंड कोण, सभामोडे कोण, वावदूक कोण, याची कल्पना साधारणपणे सभाचालकांना असली पाहिजे. त्या दृष्टीने वरील वर्गांपैकी कोण कोठे बसतो आहे, जमावाने बसत आहेत का, त्यांच्याजवळ कांहीं काव्यादिक साहित्ये आहेत का, हे सर्व न्याहाळावे व त्या त्या दृष्टीने स्वयंसेवकांची व्यवस्था करावी, गैराशिस्त विरोध केल्यास चालणार नाहीं, सभेबाहेर ताबडतोब जावे लागेल, अशी विरोधकांची खात्री व्यवस्थेच्या बंदोबस्ताने व योजनेने झाली पाहिजे, (१०) स्वयंसेवक सशक्त, शिस्तशीर, नम्र पण निश्चयी, वादविवादविमुख, झटपट काम करणारे असे निवडून त्यांना सभेपूर्वी व्यवस्थेसंबंधी पूर्ण कल्पना द्यावी. (११) सभेत शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी समाचालक व