पान:सभाशास्त्र.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समाशास्त्र ७ बातमीदारांना जर अन्यथा हक्क असेल तर, केवळ पोलीस बातमीदार म्हणून मज्जाव करता येणार नाही. पुण्यातील समस्त हिंदूंची सभा' असेल व पोलीस बातमीदार हिंदु असेल तर त्याला हजर राहाण्यास मज्जाव करतां येणार नाही, जेथे अन्य बातमीदारांना सार्वजनिक सभा म्हणून जाण्याचा अधिकार आहे तेथे पोलीस बातमीदारांनाही तो आहे. सभाचालकांनी त्यांची नीट व्यवस्था ठेवावी असे त्यांचेवर कायदेशीर बंधन नाहीं. सभाबंदीचे कायद्याखाली परवानगी घेऊन केलेल्या सभेत पोलीस बातमीदारांना, मॅजिस्ट्रेट हुकूम दिल्यास हजर राहण्याचा हक्क आहे. त्याचप्रमाणे पोलीस अॅक्टाखाली केलेल्या नियमान्वयें पोलीस बातमीदार सार्वजनिक सभेत हजर राहू शकतो. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना फुकट प्रवेश द्यावा लागतो ( डि. पो. ॐ. क, ४७). तसें बंधन पोलीस बातमीदाराबाबत नाही. मात्र अन्य बातमीदारांना जर फुकट प्रवेश असेल, तर यांनाही देणे गैर नाहीं. इतर बातमीदारांबरोबर पोलीस बातमीदारांची व्यवस्था समाचालकांनी केल्यास गैर नाहीं अगर कमीपणा आणणारे नाहीं. सभेचा हेतु, सभाकार्य- सभेतील ठराव व चर्चा राजसत्तेच्या कानांवर जावी हा असल्यास, सरकारी बातमीदारांची योग्य सोय करून देण्याने सभाचालकांचा स्वार्थच साधतो. सभाचालक–सार्वजनिक सभा बोलाविण्याचा कोणालाही अधिकार असला तरी ती बोलाविणारावर विशेष जबाबदारी असते. जे सभा बोलावितात ते सभाचालक होत, सभाचालक झाल्याने कांहीं कर्तव्ये, कांहीं जबाबदारी, कांहीं अधिकार त्यांना प्राप्त होतात, त्या सर्वांचा विचार स्थूलमानाने येथे केला आहे. | ( १ ) सभेचे कार्य व्यवस्थित व्हावे व ती शांतपणे पार पडावी म्हणून सर्व गोष्टी योजनापूर्ण झाल्या पाहिजेत, या दृष्टीने सभाचालकांनी सभेचा जाहिरात देण्यापूर्वी एकत्र येऊन कांहीं तरी संघटन, व्यवस्थापक मंडळ, सभा-कमिटी, असे काहीं तरी तयार करावे. संस्थेमार्फत सभा होणार असल्यास हा प्रश्न उपस्थित होणार नाही, कार्याच्या सोयीसाठी या मंडळाचा जबाबदार व धीरप्रवृत्ति असा इसम चिटणीस म्हणून असावा. | (२) व्यवस्थापक मंडळाने निमंत्रणपत्रिका तयार करून त्यांत सभेची तारीख, वेळ, जागा व विषय समाविष्ट करून योग्य अवकाश ठेवून ते