पान:सभाशास्त्र.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६९ सार्वजनिक सभातंत्र •••••••••••••••••• मानसन्मान अगर सोय करून घेणे हे नसून, सभेचा वृत्तांत आणि खराखरा वृत्तांत आपले पन्नास धाडणे, हे आहे याची जाणीव ठेवून वागतात. न बोल. लेलें दडपून देणे, महत्त्वाचे संदर्भ गाळून लिहिणे, चर्चेपेक्षां अन्य गोष्टींना महत्त्व देणे, गंभीर तेवढे बाजूस ठेवून कांहीं क्षुद्र अगर हास्यास्पद झालें असेल तेच नेमकें उचलून त्याला महत्त्व देणे, याने चटकदारपणा कदाचित् रिपोटत उत्पन्न होत असेल, पण त्याने वाचकावर काहीही परिणाम होत नाहीं. सार्वजनिक सभेत हजर राहणारा बातमीदार याने आपण. प्रथम नागरिक आहोत, नंतर पत्रकार आहोत, हे विसरू नये. उत्कृष्ट बातमीदाराने जे घडले असेल ते यथातथ्य देऊन स्वतःची निराळी टीका अगर निरीक्षण लिहावे व त्याप्रमाणे करणेही योग्य ठरते. यांत त्याचा, त्याचे वर्तमानपत्राचाही लौकिक वाढतो. तथापि सभाचालक बातमीदारावर काय लिहावे, कसे लिहावे यावर बंधन घालू शकत नाहीं, व घालणेही इष्ट नाहीं. सार्वजनिक सभा म्हणजे भाषणस्वातंत्र्याची कर्मभूमि, भाषणस्वातंत्र्याबरोबर मुद्रणस्वातंत्र्यही तितकेच महत्त्वाचे आहे. याही स्वातंत्र्याला मर्यादा आहेत, पण त्या घालण्याचा हक्क सभाचालकांना नाही. सभाचालकांनी आपले वागणुकीनं बातमीदारांना दुखवू नये, विश्वासात घ्यावे व सहकार्याने सभाकायला जास्तीत जास्त प्रसिद्धि मिळवावी. बातमीदारा–बातमीदारांत डावे उजवे करूं नये. पास झालेल्या ठरावाच्या अधिकृत प्रति सर्वांना द्याव्यात; वक्त्यांची माहितीही पुरवावी; व ही पुरवितांना न्याय्य दृष्टि ठेवावी. बातमीदार भले आपले रिपोटाँत, वक्त्यावक्त्यामध्ये भेद करोत. कोणाचे भाषण किती द्यावे, त्यांतील काय द्यावे, किती कोट्या द्याव्यात, कोणाला किती प्रसिद्ध द्यावी हैं। बातमीदाराने स्वतःच ठरवावयाचे असते. सभेच्या कार्याचा, ठरावांचा व चर्चेचा सर्वसाधारणपणे यथातथ्य रिपोर्ट येईल इतकी तरी अपेक्षा सभाचालकांची असते, व ती सफल व्हावी म्हणून जरूर ते सहकार्य पत्रप्रतिनिधींशी त्यांनी करणे इष्ट असते. वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होणारा वृत्तांत सत्य व समतोल असून असभ्य, अपमानकारक, व बदनामी करणारा नसावा, हे सूत्र बातमीदारांनी नेहमी लक्षात ठेवावे. पोलीस बातमीदारः–सार्वजनिक सभेला म्हणजे ६ जेथे आम जनतेला अगर जनतेच्या एखाद्या भागाला अनियंत्रितपणें अगर कांहीं मर्यादेत हजर राहण्याचा अगर प्रवेश करून घेण्याचा हक्क आहे तेथे पोलीस