पान:सभाशास्त्र.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभााास्त्र ६८ येथे करणे आहे. सभेचे आमंत्रण जरी जाहीर असले तरी सर्व लोक येऊ शकत नाहीत. काय झाले हे जाणण्याची अनेकांची इच्छा असते, पण ते हजर राहू शकत नाहींत. शिवाय सभेत जे कार्य होईल ते प्रचाराचे दृष्टीने प्रसिद्ध होऊन जास्तीत जास्त लोकांचे अवलोकनांत यावे अशी अपेक्षा सभाचालकांची असते; म्हणून सभाकायचा वृत्तान्त चांगल्या रीतीने प्रसिद्ध होईल यासाठी सभाचालकांनी दक्षता घेणे जरूर आहे, सभाचालकांनी स्थानिक वृत्तपत्रांना आपले बातमीदार धाडण्यास विनंति करणे अयोग्य नाहीं. बहुशः सभेचे महत्त्व ओळखून बातमीदार आपण होऊन हजर राहतातच. सभास्थान बातमीदारांसाठ सभामंचाजवळ, पण सभामंचावर नव्हे, अशी जागा राखून ठेवावी. शक्य असेल तर टेबल, खुर्ची अगर डेस्क यांची व्यवस्था करावी. रात्रीची सभा असेल तर योग्य प्रकारे प्रकाशाची पण व्यवस्था असली पाहिजे, स्थानिक वृत्तपत्रे नसतील तर अन्य ठिकाणच्या वृत्तपत्रांचे बातमीदार असतात, त्यांना हजर राहण्यास सांगणे गैर नाही. कोणीही बातमीदार नसल्यास समाचालकांनी एका योग्य माणसाची निवड करून त्यास सभेचा वृत्तांत घेण्यास सांगावे. किंबहुना बातमीदार असोत अगर नसोत समाचालकांनी आपला अधिकृत वृत्तान्त घेण्यासाठीं एक इसम ठेवणे इष्ट असते. बातमीदार हा स्वप्नवृत्ति, आपल्या वर्तमानपत्राचे धोरण, त्याला मिळालेली वागणूक या दृष्टीने सभेकडे पाहत असतो, आणि त्या दृष्टीने टिपणे करीत असतो व सभेचा रिपोर्ट देत असतो. यथातथ्य वृत्तांतासाठी, सभाचालकांनी आपला मनुष्य ठेवणे, यासाठी इष्ट असते. पुष्कळ वेळां सभेत प्रत्यक्ष काय घडले व कसकसे घडले हा वादाचा मुद्दा ठरतो व त्याला महत्त्व येते. यासाठी जसे घडले तसे नमूद करणारा इसम असणे इष्ट असते. बातमीदार नसतील त्या वेळी या इसमाचे वृत्तांतावरून अधिकृत रिपोर्ट तयार करून समाचालकांनी जरूर त्या वृत्तपत्रांकडे प्रसिद्धीसाठी धाडावा. या अधिकृत रिपोर्टात पास झालेला ठराव व त्यावरील चर्चा थोडक्यांत असावी. ठराव कसा पास झाला हे त्यात असावें, अधिकृत रिपोर्ट तयार झाल्यानंतर अध्यक्षांना दाखवून नंतर प्रसिद्धी साठी द्यावा. - बातमीदारांची योग्य ती सोय करणे हे सभाचालकांचे कर्तव्य आहे. समजूतदार बातमीदार, त्यांच्या अडचणी समजतात व स्वतःचे कर्तव्य