पान:सभाशास्त्र.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६७ सार्वजनिक सभातंत्र •••• जाऊन उगाच शंका विचारून, टीका करून, आपण वक्त्याशीं अगर पुढाच्याशी बोललों में लोकांना दाखवावयाचे असते. कांहीं वेळां कांहीं लोकांना प्रामाणिकपणे वक्त्याशी बोलावयाचे असते अगर अन्य काम असते. हा सर्व अनुभव लक्षात घेऊन सभाचालकांनी या कामी दक्षता घेऊन कांहीं शिस्त निर्माण केली पाहिजे. सभा शांतपणे संपून या शेवटच्या गोंधळांत मोडतोड होते; बैठकीची नासधूस होते. वक्त्यानेही सहकार्य करून सभाचालकांचे ऐकले पाहिजे. व्यासपीठाकडे धाव घेऊन श्रोते, गोंधळ व प्रसंग काय अनर्थ उत्पन्न करतात याची कल्पना खुद्द त्यांनाही नसते. तसेच पुढारी अगरं वक्ता ज्या वाहनाने जाणार आहे त्याभोंवताल गर्दी करून, त्यावर चढून उत्साहापेक्षां उच्छृखलपणाच ते जास्त दाखवितात, वाटेल त्याने स्वाक्षरी मागावी व वाटेल त्यावर, प्रसंगी सभेच्या हस्तपलकावर ती घ्यावी यांत औचित्य खास नाहीं. विनामूल्य मिळते म्हणून विनय सोडून ती घ्यावी हे इष्ट नाहीं. कांहीं मर्यादा देणाराने घालावी व कांहीं व्यवस्था समाचालकांनी करावी हें योग्य आहे. प्रक्षुब्ध सभा संपते तेव्हां, अगर सभा गोंधळांत मोडते तेव्हां, सभाचालकांवर अधिक जबाबदारी आहे. शक्य तेवढ्या लवकर त्यांनी सभास्थान खालीं करावें. मुले व स्त्रिया यांना हलवावें. सभेच्या अगर कांही लोकांच्या रोषास पात्र झालेल्या वक्त्यास, संरक्षण देऊन शक्य तितक्या लवकर सभास्थानांतून सुरक्षत जागी हलवावें. पुष्कळ वेळां वक्ता स्वाभिमानाच्या व धैर्याच्या कल्पनेला बळी पडून जाण्याचे नाकारतो, परंतु तेवढ्याने सभाचालकांची जबाबदारी संपली असे होत नाहीं. सभास्थानांत जे कांहीं घडेल त्याची जबाबदारी त्यांचेवर आहे. शक्य तेवढी ती त्यांनी, स्वयंसेवक, कार्यकर्ते यांच्या साहाय्याने पार पाडली पाहिजे. नाइलाज झाला, मर्यादेपलीकडे परिस्थिति गेली तर, पोलिसांची मदत घेणे चूक ठरणार नाही. विरोधालाही न जुमानतां व्याख्यान झाले असेल, ठराव झाला असेल तर, सभास्थान सोडल्यानंतरही रस्त्यांत विरोधक गुंडगिरी करण्यास व वक्त्यास ‘प्रसाद देण्यास कमी करीत नाहीत. तथापि सभास्थानाबाहेर काय घडेल याची जबाबदारी सभाचालकांवर नाहीं. | वृत्तान्तप्रसिद्धिः—सभानिमंत्रणाची प्रसिद्ध कशी असावी या बद्दलचा विचार पूर्वीच केला आहे. सभेत काय घडले याच्या प्रसिद्धीचा विचार