पान:सभाशास्त्र.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ទី ១

          • * ********

••••• सभेतील मतभेद, चर्चेतील जखमा, अध्यक्षीय समारोपानंतर व आभारप्रदर्शनानंतर जरी नाहीशा झाल्या नाहीत तरी त्यांची तीव्रता कमी झाली पाहिजे. मतभेद आहेत, भिन्न विचारसरणी आहे म्हणून विचारावनिमय व चर्चा व तिचे माध्यम म्हणून सभा व तिचा उद्देश, शक्यतर एकवाक्यता, निदान जास्तीत जास्त समन्वय, आणि हे साधण्याऐवजी जर सभेअंती वैराचा वारसा घेऊन लोक घरोघरी गेले तर, सभा विफल झाली असे होईल. आभारप्रदर्शन जबाबदार व प्रसंग ओळखणाच्या माणसाने योग्य शब्दांत केल्याने वरील विफलता टळेल. राष्ट्रगीतः- विशिष्ट प्रसंग असल्याशिवाय सभेच्या शेवटी राष्ट्रगीत असू नये. प्रत्येक सार्वजनिक सभेचा शेवट राष्ट्रगीतांत व्हावा असा कांहीं नियम नाही व तशी आवश्यकताही नाही. कार्यक्रमांत ते ठेवले असेल तर ते गाणारा आगाऊ योजून ठेवलेला असावा, त्यास सभामंचाजवळ वेळीच आणून बसवावें, राष्ट्रगीत त्याने एकट्याने का सर्वांनी, त्याचेबरोबर का मागाहून म्हणावयाचे याबाबत अजून काही निश्चित संकेत नाहीत. त्यामुळे अनेक वेळां गोंधळ होतो व गीताचे गांभीर्य व पावित्र्य यांना बाध येतो. सर्वांनी ते त्याजबरोबर शांततेने सावकाश म्हणावे हा उत्कृष्ट मार्ग आहे. राष्ट्रगीत गातांना सर्वांनी उभे राहिले पाहिजे हा संकेत आतां प्रतिष्ठा पावला आहे. भिन्न धर्मीयाने अगर ते अमान्य करणारानेही उभे राहावे; यांत त्याची अप्रतिष्ठा नाही, उलट सौजन्य दिसून येते. राष्ट्रगीत अगर ते नसल्यास आभारप्रदर्शन संपताच ‘सभा संपली' असे अध्यक्षांनी जाहीर करावे. सभाविसर्जनः- सभेत प्रवेश करण्याबाबत, बसण्याबाबत जशी व्यवस्था असली पाहिजे, तसेच सभा संपताच कसे जावे, प्रथम कोण जावें हैं। प्रसंग आगाऊ जाहीर करणे इष्ट असते. सभेला पुष्कळ वेळां अज्ञान मुले येतात, स्त्रियाही असतात. सभा संपतांच एकदम जो तो बाहेर जाऊ इच्छितो, गर्दी होते. गुंडगिरी करणारेही आपला पराक्रम दाखवितात. जेव्हां प्रचंड लोकसमुदाय उपस्थित झाला असेल तेव्हां, सभा संपली हे जाहीर करतांनाच अध्यक्षानें अगर सभाचालकांनी सभास्थान खाली करण्यासाठी जे धोरण ठरविले असेल ते जाहीर करावें. स्वयंसेवकांनी त्याप्रमाणे घडवून आणावे. स्त्रिया व मुले यांना प्रथम जाण्यास सांगावे, व तदनंतर इतरांना. सभा संपताच व्यासपीठाकडे अनेक श्रोते धांव घेत असतात. त्यांना प्रसंगी ‘दशन घ्यावयाचे असते, ‘स्वाक्षरी घ्यावयाची असते. पुष्कळ वेळा शिष्टपणे जवळ